प्रलंबित संच मान्यता कामकाजाबाबत sanchmanyata
संदर्भ:- संचालनालयाचे पत्र जा.क्र शिसंमा / टि-८ब/२०२५/५१३३ दि.३१/१०/२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भीय पत्रान्वये आपणांस संच मान्यता सन २०२५-२६ निर्गमित करणेसाठी इयत्ता १ ली ते १० वी व ११ वी ते १२ वी च्या शाळा / वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार व माध्यमाबाबतची माहिती शाळेकडील स्कूल पोर्टलवरून भरून /अद्यावत करून घेणे आवश्यक असून, त्याबाबतची कार्यवाही तात्काळ पुढील दोन (२) दिवसात पूर्ण करून घ्यावी. सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन २०२५ २६ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी / शि. उं. स यांच्या लॉगिनला उपलब्ध होणार नसल्याने, विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करून घ्यावी.
सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संच मान्यता उपलब्ध झाली नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. असे सुचीत करण्यात आलेले होते.
तथापि, अदयापही संच मान्यता कामकाज प्रलंबीत असल्याने शिक्षकांचे वेतन, भत्ते व अनुषांगिक लाभ अदा न झाल्यास अथवा त्याबाबत भविष्यात काही प्रकरण उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळा/कनिष्ठ महाविदयालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, केंद्र प्रमुख व शिक्षणाधिकारी यांची राहील. याची नोंद घ्यावी.











