भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारी, २०२६ republic day celebration 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारी, २०२६ republic day celebration 

शासन परिपत्रक :-

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ०९-१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८-३० ते १०.०० वा. च्या दरम्यान ध्वजवंदनाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजवंदन समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८-३० वा. च्या पूर्वी किंवा १०.०० वा. च्या नंतर करावा.

२. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सकाळी ९-१५ वाजता शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल.

३. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे संबंधित जिल्ह्यांचे मा. पालकमंत्री / मा. मंत्री / मा. राज्यमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतीलः-

४. राष्ट्रध्वजवंदन करणारे मा. पालकमंत्री / मा. मंत्री / मा. राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजवंदन करावे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी राष्ट्रध्वजवंदन करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजवंदन समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्विकारतील, महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतीवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

५. राष्ट्रध्वजाला वंदन करताना “राष्ट्रगीत” म्हणण्यात यावे/वाजविण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन “राज्यगीत” वाजविण्यात यावे. ध्वजवंदन समारंभ अध्यक्षस्थान स्विकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी.

६. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/ (ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजवंदनाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

७. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी/ कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.

८. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगो परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व व्यक्तीनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग / कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.

९. स्थानिक लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नीना व आई-वडील तसेच आणिबाणीच्या कालावधीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्ती यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी.

१०. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा.

११. दिवसभरात विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात यावे. महत्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा, शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व Digital माध्यमांद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा / संदेश द्यावा, याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

१२. ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसंदर्भात आचारसंहिता लागू असल्यास त्या जिल्ह्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात :-

१) ध्वजवंदनाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

२) कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करण्यात येऊ नये.

३) मा. पालकमंत्री / मंत्री / राज्यमंत्री यांचा भाषणाचा आशय केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तुत्व या पुरतेच मर्यादित असावा. बलिदान दिलेल्या हुतात्मांचा तसेच देशाचा गौरव यासंदर्भातील भाषणे असावीत, कोणत्याही राजकीय स्वरुपाची भाषणे नसावीत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२६०१२११७०८२४३३०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारी, २०२६ परिपत्रक pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment