शासन विनिर्दिष्ट आकस्मिकता/गंभीर असलेल्या आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकाराबाबत ajar pramanikaran paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासन विनिर्दिष्ट आकस्मिकता/गंभीर असलेल्या आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकाराबाबत ajar pramanikaran paripatrak 

संदर्भः-१. मा.ना.श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा), विधानसभा सदस्य (जळगांव शहर) यांचे पत्र जा.क्र.एसबी/विसस/ऑगस्ट ९५ २०२५, दिनांक ३०.०८.२०२५

२. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव यांचे पत्र क्र. शार्वमवरुज/लले/वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके/मा. आमदार/३९६३-६४/२०२५, दि.१४.१०.२०२५

संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने सर्व संस्था प्रमुखांना कळविण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकार, शासन निर्णय क्रः एमएजी-१०९९/प्र.क्र.१४/आरोग्य-३, दिनांक २५ फेब्रुवारी, १९९९ व शासन निर्णय क्रः एमएजी १०९९/प्र.क्र.२२२/आरोग्य-३, दिनांक २० ऑगस्ट, १९९९ नुसार प्रदान करण्यात आलेले आहे. (सोबत, शासन निर्णयांच्या प्रती)

२. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरील शासन निर्णयांनुसार, अतितात्काळ सेवेची प्रकरणे त्या त्या जिल्हयातील जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविण्यात यावी. ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये असतील तेथे महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांचेकडे अशी प्रकरणे पाठविण्यात यावेत. असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

३. तरी, काही ठिकाणी आजार जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रमाणित होत असल्याचे संदर्भाधिन पत्र क्र.१ व २ च्या अनुषंगाने दिसून येत आहे. त्यामुळे असे निर्देश देण्यात येत आहे की, आता महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्हयामध्ये वैद्यकीय महाविद्यालये असल्याने जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आजार अधिष्ठाता/वैद्यकीय अधिक्षक यांचेकडूनच प्रमाणित होतील, याची दक्षता घ्यावी.

Related posts:

1 thought on “शासन विनिर्दिष्ट आकस्मिकता/गंभीर असलेल्या आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकाराबाबत ajar pramanikaran paripatrak ”

Leave a Comment