सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikt shikshak samayojan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikt shikshak samayojan 

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.२२/१७/टिएनटी-२, दि.१५.०३.२०२४ २. मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र जा.क्र. शिसंमा २०२५-२६/ समायोजन/ टी-०८, दि.२९/११/२०२५

उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित / अंशता अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विषद केली आहे. तसेच संदर्भ २ अन्वये दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे.

सन २०२५-२६ ची संच मान्यता शासन निर्णय दि. १५.०३.२०२४ मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दि.२३.१०.२०२५ रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे डिसेंबर २०२५ मध्ये शिक्षणाधिकारी लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.५४५६/२०२५ दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मा. न्यायालयाने दि.२३.०४.२०२५ रोजी जैसे-थे आदेश पारित केलेले असल्याने सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती,

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.५४५६/२०२५ मध्ये मा. न्यायालयाने दि. १४.११.२०२५ रोजीच्या आदेशान्वये शा.नि.दि.१५.०३.२०२४ च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्र.५४५६/२०२५ सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत.

तद्नुषंगाने शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतूदीनुसार सन २०२५-२६ च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दि.१३.०२.२०२६ पर्यंत घोषित करावी.

तदनुसार सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ मधील तरतूदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हास्तवरील कार्यवाही दि.०३.०३.२०२६ पर्यंत करावी.

तद्नंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यांनतर रिक्त जागा (संवर्ग, विषय, इयत्ता निहाय) व अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दि.१०.०३.२०२६ पूर्वी सादर करावी.

विभागीय शिक्षण उपसंचालक, यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दि.२५.०३.२०२६ पर्यंत पूर्ण करावी, व

उर्वरित रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग/ विषय / अनुदानाचा / व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास दि. ३१.०३.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत सादर करावा.

दि.०३.०३.२०२६ पर्यंत जिल्हा स्तरावरील आणि दिनांक २५.०३.२०२६ रोजी विभाग स्तरावर समायोजन झालेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे /शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरीत केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरीत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, याची नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशिल / अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग/ चिषय/ अनुदानाचा / व्यवस्थापना प्रकारसह) संचालनालयास सोबत जोडलेल्या नमून्यामधील तपशिलासह दि.३१.०३.२०२६ पर्यंत सादर करावा. सदर बाब प्राथमिक/माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागु आहे.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment