सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam question bank 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच competitive exam question bank 

➡️सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची ‘द्विनाम पद्धती’

यांनी पहिल्यांदा वापरली.

(1) कोपलैंड

(2) कार्लस लिनियस

(3) व्हिटाकर

(4) चॅटन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️शर्करेपासून बनलेली असते.

(1) शैवाल

(2) कवक

(3) जीवाणू

(4) विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

परपोषी सजीव आहे.

(1) क्लॅमिडोमोनास

(2) क्लोरेल्ला

(3) कवके

(4) युग्लिना

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️गटात न बसणारा शब्द ओळखा.

(1) आदिजीव

(2) कवके

(3) जीवाणू

(4) शैवाले

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण :

1 मीटर =……….मायक्रोमीटर

(1) 10 चा 3 घात

(2) 10 चा 9 घात

(3) 10 चा 6 घात

(4) 10 चा 7 घात

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

मक्याच्या कणसावरील बुरशीला म्हणतात.

(1) अॅस्परजिलस

(2) पेनिसिलिअम

(3) भूछत्रे

(4) किण्व

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️इ. स. 1866 साली यांनी सजीवांना 3 सृष्टींमध्ये विभागले.

(1) कार्ल लिनिअस

(2) कोपलँड

(3) चॅटन

(4) हेकेल

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

जास्वंद’ या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते ?

(1) हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस

(2) कॅनिस फॅमिल्यरिस

(3) बोस टॉअरस

(4) सॉर्घम व्हलगेर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️………यांनी इ. स. 1925 मध्ये सजीवांचे आदिकेंद्रकी व दृश्यकेंद्रकी असे दोन गट केले.

(1) व्हिटाकर

(2) कार्ल लिनिअस

(3) चॅटन

(4) कोपलैंड

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️…………हे सजीव-निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत, असे म्हणतात.

(1) जीवाणू

(2) कवके

(3) शैवाले

(4) विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️……..या आदिजीवामुळे आमांश होतो.

(1) एन्टामिबा हिस्टोलिटिका

(2) प्लास्मोडिअम व्हायव्हॅक्स

(3) युग्लीना

(4) पॅरामेशिअम

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️………….विषाणूंचा आकार सुमारे एवढा असतो.

(1) 10 µm ते 100 µm

(2) 1 µm ते 10 µm

(3) 200 μm

(4) 10 nm ते 100 nm

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️———– हे मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने प्रजनन करतात.

(1) जीवाणू

(2) विषाणू

(3) कवके

(4) शैवाले

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ ‘कुत्रा’ या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे.

(1) बोस टॉअसर

(2) कॅनिस फॅमिल्यरिस

(3) हिबिस्कस रोझा-सायनेन्सिस

(4) सॉर्घम व्हलगेर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️ दही किंवा ताकामध्ये जीवाणू आढळतात.

(1) लॅक्टोबॅसिलाय

(2) व्हायब्रीओ कोलेरी

(3) स्टॅफायलोकॉकस

(4) क्लोस्ट्रिडिअम बोट्यूलीनम

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️पुढीलपैकी कवक कोणते ?

शैवाल, अमिबा, पेनिसिलिअम, युग्लीना

(1) शैवाल

(2) अमिबा

(3) पेनिसिलिअम

(4) युग्लीना

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️रॉबर्ट व्हिटाकर यांनी इ. स. 1969 मध्ये सजीवांची

गटांत विभागणी केली.

(1) 3

(2) 4

(3) 2

(4) 5

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️…………प्लास्मोडिअममुळे होतो.

(1) एड्स (HIV)

(2) आमांश

(3) मलेरिया

(4) पोलिओ

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️लॅक्टोबॅसिलाय कोणत्या सृष्टीत वर्गीकृत केला जातो?

(1) प्रोटिस्टा

(2) मोनेरा

(3) कवक

(4) वनस्पती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️………….. मध्ये हरितद्रव्ये नसल्यामुळे ती प्रकाश-संश्लेषण करू शकत नाही.

(1) शैवाल

(2) बुरशी

(3) निवडुंग

(4) कमळ

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव सृष्टीतील आहेत.

(1) वनस्पती

(2) प्रोटिस्टा

(3) मोनेरा

(4) कवके

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत यांनी वापरली.

(1) कार्ल लिनिअस

(2) रॉबर्ट व्हिटाकर

(3) हेकेल

(4) चॅटन

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️गटात न बसणारा शब्द ओळखा :

पोलिओ विषाणू, इन्फ्लुएंझा विषाणू, HIV-एड्स विषाणू, पिकोर्ना विषाणू.

(1) पोलिओ विषाणू

(2) इन्फ्लुएंझा विषाणू

(3) HIV-एड्स विषाणू

(4) पिकोर्ना विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️आदिकेंद्रकी पेशीचा आकार असतो.

(1) 5-100 मायक्रोमीटर

(2) 1-10 मायक्रोमीटर

(3) 5-100 नॅनोमीटर

(4) 1-10 नॅनोमीटर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️ दृश्यकेंद्रकी एकपेशीय सजीवांचा समावेश सृष्टीमध्ये केला जातो.

(1) मोनेरा

(2) प्रोटिस्टा

(3) कवके

(4) शैवाले

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा :

(1) मानव – इन्फ्लुएंझा विषाणू

(2) जीवाणू – बॅक्टेरिओफाज विषाणू

(3) वनस्पती – टॉमेटो विल्ट जीवाणू

(4) गुरे – पिकोर्ना विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️मोनेरा सृष्टीत जीवाणूंच्या व्यतिरिक्त आणखी कोणते सजीव येतात ?

(1) विषाणू

(2) कवक

(3) नीलहरित शैवाल

(4) आदिजीव

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️…………हे मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात.

(1) शैवाले

(2) कवके

(3) आदिजीव

(4) विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️……….म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.

(1) जीवाणू

(2) शैवाले

(3) कवके

(4) विषाणू

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️ दृश्यकेंद्रकी पेशीचा आकार असतो.

(1) 1-10 मायक्रोमीटर

(2) 5-100 मायक्रोमीटर

(3) 5-100 नॅनोमीटर

(4) 1-10 नॅनोमीटर

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️ पुढीलपैकी असत्य जोडी ओळखा :

(1) कवक-कॅन्डिडा

(2) आदिजीव-अमिबा

(3) शैवाल-आदिकेंद्रकी

(4) विषाणू – बॅक्टेरिओफाज

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

➡️ पेशीभित्तिका असणाऱ्या पण प्रकाश-संश्लेषण करू न शकणाऱ्या सजीवांचा समावेश …………सृष्टीमध्ये होतो.

(1) वनस्पती

(2) प्राणी

(3) मोनेरा

(4) कवके

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

➡️नीलहरित शैवालांचा समावेश सृष्टीमध्ये होतो.

(1) मोनेरा

(2) प्रोटिस्टा

(3) कवके

(4) वनस्पती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

➡️………. हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात.

(1) टॉमेटो विल्ट

(2) बॅक्टेरिओफाज

(3) पिकोर्ना

(4) इन्फ्लुएंझा

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

➡️गटात न बसणारा शब्द ओळखा.

(1) गोलाकार

(2) तरफदार

(3) दंडाकार

(4) सर्पिलाकार

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

Leave a Comment