समग्र शिक्षा अंतर्गत SNA Sparsh प्रणालीमध्ये शालेय स्तरावरून Current Bank Accounts उघडणेबाबत
महोदय,
उपरोक्त विषयी सादर करण्यात येते की, समग्र शिक्षा योजनेंतर्गत SNA-SPARSH कार्य प्रणालीवर सर्व जिल्ह्यांचे On Boarding होणेबाबत प्रस्तावित आहे. सदर On Boarding च्या पूर्वतयारीकरिता जिल्हास्तरीय अधिकारी/कर्मचारी व शाळास्तरावरील मुख्याध्यापक यांना SNA SPARSH प्रणालीमध्ये देयके पारित करण्यासाठी अवलंब करण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयामर्फत Video Conference द्वारे जिल्हानिहाय Online प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शालेय स्तरावरून Current Bank Accounts व शाळेचा TAN Number काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यानुषंगाने यापूर्वी दि.१०.१२.२०२५, दि.१७.१२.२०२५, दि.२२.१२.२०२५ व दि.०९.०१.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या Online V.C मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत SNA SPARSH प्रणालीमध्ये शालेय स्तरावरून Current Bank Accounts व शाळेचा TAN Number काढण्याबाबत सूचना/मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच या कार्यालयाकडून Current Bank Accounts उघडण्याकरिता बँकांना दयावयाचे पत्र दि.२०.०८.२०२५ व दि.१८.१२.२०२५ अन्यये निर्गमित करण्यात आले होते. तथापि, बहुतांश जिल्ह्यामध्ये याबाबत प्राधान्याने कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येते. या अनुषंगाने दि.१३.०१.२०२६ रोजी घेतलेल्या Online VC नुसार राज्यातील एकूण ६४२३२ शाळांपैकी फक्त ८९२९ शाळांची Current Bank Accounts उघडण्यात आली असून १८४८३ शाळांचे TAN Number प्राप्त झालेले आहेत.
तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या स्तरावरून Current Bank Accounts उघडण्याबाबत व शाळांचे TAN Number प्राप्त करण्याबाबत संबंधिताना निर्देश व्हावेत जेणेकरून समग्र शिक्षा ही केंद्रपुरस्कृत योजना SNA SPARSH प्रणालीवर विहित कालावधीत On Board होणे शक्य होईल.
(टिप्पणी मा. राज्य प्रकल्प संचालक यांचे मान्यतेने)










