स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या अस्थिव्यंग प्रवर्गातील विशेष उपक्रमांमधील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत disability student education 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या अस्थिव्यंग प्रवर्गातील विशेष उपक्रमांमधील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत disability student education 

संदर्भ:-

१) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६.

२) दिव्यांगांसाठीच्या विशेष उपक्रमांसाठीची सुधारित शाळा संहिता, २०१८.

३) शासन निर्णय दि.०७ मे. २०२४ अन्वये गठीत करण्यात आलेल्या समितीचे दि. २७ मार्च, २०२५ रोजीचे इतिवृत्त.

४) दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्र.इडीडी-२०२५/प्र.क्र.२३६/कार्या-०२, दि.३० डिसेंबर, २०२५

महोदय,

विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन अधिनियम, शासन निर्णय व इतिवृत्त कृपया पहावे.

२. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम १६ व १७ अन्वये दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अधिनियमामधील प्रकरण ३ कलम १६ (३) नुसार विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना reasonable accomodation उपलब्ध करून देणे ही शैक्षणीक संस्थांची जबाबदारी आहे. अशी तरतूद आहे. सबब अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत प्रवेश देऊन सर्वसमावेशी शिक्षण देणे शक्य आहे.

३. राज्यातील दिव्यांगांसाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा टप्या-टप्प्याने सर्वसाधारण शाळेमध्ये समावेश करण्याचे अनुषंगाने दीर्घकालीन धोरण (Long term strategy) निश्चित करण्यासाठी शासन निर्णय दि.०७ मे, २०२४ प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक दि. १३ मार्च, २०२५ रोजी पार पडली. सदर बैठकीचे इतीवृत्त दि. २७ मार्च, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार विशेष उपक्रमांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने सामान्य शाळेत समाविष्ट करणेबाबत आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांना निर्देश दिले आहेत. तसेच अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्राथम्याने सामान्य शाळेत समायोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

संकिर्ण-2016/प्र.क्र.11/2

1/516600/2026

४. उपरोक्त वस्तूस्थिती व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम १६ व १७ मधील सर्वसमावेशी शिक्षणासंदर्भातील तरतूदी विचारात घेता विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अस्थिव्यंग प्रवर्गाच्या उपक्रमांमधील विद्यार्थ्यांचे सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून नजीकच्या सर्वसाधारण शाळेत समायोजन करावे. सदर उपक्रमांमधील मान्यताप्राप्त कार्यरत कर्मचाऱ्यांचे शासन निर्णय दि.३० डिसेंबर, २०२५ अन्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने समायोजन करावे व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment