प्राथमिक शाळांच्या २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षातील कामाचे दिवस व वार्षिक सुट्टयांबाबत (मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम) educational year holidays
परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ :-
१) मा.शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे १ यांचेकार्यालयाकडील पत्र क्र. प्राशिस/सुट्टया/२०१४/७-५१६/२१, दि.०१/०१/२०१४
२) मा. संचालक, महाराष्ट्र विदया प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.विप्रा/अविवि / ता.वि./२०१७-१८/३६०५ अ दि.५/१०/२०१७
३) मा. सह सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५८/एस.डी.-४ दिनांक ११ एप्रिल २०२२
परिषद अहिल्यान
४) मा.आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे याचे कार्यालयाकडील पत्र क्र. आशिका/स्वी. स./स्थानिक सुट्टया /२०२३/००५२१, दि.१७/०१/२०२३
५) मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील राजपत्र असाधारण अधिसुचना सार्वजनिक सुट्टया -२०२५ दिनांक ४ डिसेंबर २०२४
६) मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर, यांचेकडील पत्र क्र. सशा/कार्या-७/संकीर्ण/२०२५ दिनांक ०७/०१/२०२५
७) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे १ यांचे कार्यालयाकडील पत्र क्र. शिसमा-२५/ (ओ-०१) उन्हाळी सुट्टी / एस-१/२२३७ दि.२९/०४/२०२५
८) मा.शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, पुणे याचे कार्यालयाकडील पत्र राशैसप्रपम/अविवि/एफएस/२०२५ दि.०२/७/२०२५
परिपत्रक येथे पहा pdf download
अहिल्यानगर जिल्हयातील प्राथमिक शाळांच्या (मराठी /इंग्रजी व उर्दू माध्यम) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील कामाचे दिवस व वार्षिक सुट्टया सोबत दिलेल्या यादी प्रमाणे व त्याबाबत आवश्यक सूचना खालील प्रमाणे असतील.
१. स्थानिक राखीव सुट्टी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती / प्रशासनाधिकारी महानगरपालिका /नगरपालिका व नगर परिषद यांच्याकडून मुख्याध्यापकांनी मंजूर करुन घ्यावी. स्थानिक राखीव सुट्टी ही स्थानिक यात्रा / उरुस इत्यादी विचारात घेऊन देण्यात यावी.
२. गटशिक्षणाधिकारी यानी संदर्भ क्र.२ व ८ नुसार अध्यापनाच्या तासिका पुर्ण होतील यानुसार वेळापत्रक तयार करावे.
३. शिक्षकांनी शालेय वेळेपूर्वी १५ मिनीटे आगोदर उपस्थीत रहावे.
४. राष्ट्रीय सण / थोर व्यक्तीची जयंती / पुण्यतिथीची सुट्टी असेल तेंव्हा राष्ट्रीय सण / जयंती / पुण्यतिथी विद्यार्थ्यां समवेत साजरी करुन सुट्टी घ्यावी.
५. मा. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक जिल्हयासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्टया तसेच शासन स्तरावरुन जाहिर करण्यात आलेल्या सर्वच सार्वजनिक सुट्टया शाळांनी घेणे बंधनकारक आहे.
६. शनिवारच्या शाळेची वेळ सकाळी ७.१५ ते ११.३० अशी राहिल. (दिनांक १६ जुन २०२५ ते १५/०३/२०२६ पर्यंत )
७. रमजान पवित्र सणामुळे उर्दू शाळाची वेळ सदर कालावधीत सकाळ सत्रात ७.००ते १२.०० अशी राहील.
८. उन्हाळयाच्या कालावधीत उन्हाच्या तीव्रतेपासुन विदयार्थ्यांचे आरोग्याचे संरक्षण व्हावे या दृष्टीने दि.१६/०३/२०२६ पासून दि. ३०/०४/२०२६ पर्यंत सोमवार ते शनिवार सकाळ सत्रात ७.०० ते १२.०० अशी शाळेची वेळ राहील.
९. सदर यादीचे मुख्याध्यापकांनी काटेकोर पालन करावे. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील.
१०. शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये कामानिमित्त येताना गट शिक्षणाधिकारी यांची लेखी परवानगी आणणे आवश्यक आहे.
११. वरील यादीतील सुट्टयांमध्ये काही बदल झाल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद अहिल्यानगर यथावकाश कळवतील. सदरची यादी आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी,