१००% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणेबाबत free books pathyapustake 

१००% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणेबाबत free books pathyapustake 

संदर्भ-आपले पत्र क्र.SAR/H२H/MRJPHS/२५-५२ मोफत पाठ्यपुस्तके दि. २८/०७/२०२५.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, राज्यातील अनेक शाळांना त्यांच्या मागणीनुसार सर्व पुस्तके प्राप्त झाली नसून काही शाळांना केवळ अर्धवट, तर काही शाळांना अजिबातच पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. याबाबत अनेक पालकांनी/शिक्षकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत असे पत्रात नमूद आहे.

या अनुषंगाने कळविण्यात येते की, या कार्यालयाच्या दि.१५/०७/२०२५ च्या पत्रानुसार, समग्र शिक्षा व पीएमश्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके सन २०२५-२६ करिता, पाठयपुस्तकांचे समायोजन करणेबाबत सर्व जिल्हयांना कळविण्यात आलेले आहे. पाठ्यपुस्तके प्राप्त न झालेल्या अथवा अर्धवट पाठ्यपुस्तके प्राप्त झालेल्या राज्यातील ज्या शाळांच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या शाळांची नावे व सदर शाळांना प्राप्त न झालेल्या पाठ्यपुस्तकांची सविस्तर माहिती या कार्यालयास पाठविण्यात यावी जेणेकरुन पुढील योग्य ती कार्यवाही करता येईल.

Leave a Comment