दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत indian independance day
संदर्भ :- १. शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी-४, दि.३१.१२.२०२४
२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी.४, दि.१९.०७.२०२५ (प्रत संलग्न)
शासन परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२४ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध (प्रभात फेरी, भाषण/निवंध / कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी) उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत.
संदर्भाधीन शासन पत्र दि.१९ जुलै, २०२५ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व शाळांमध्ये कवायात कार्यक्रमाचे (साधारणतः वीस मिनिटे कालावधी) आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. सदर कवायतींचा मार्गदर्शक व्हिडीओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे.
१. वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात.
२. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी विद्यार्थ्यांनामध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा,
३. यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करुन हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील. तसेच, आवश्यक सराव करुन कवायात प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्यास्तरावरुन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.