सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार उदाहरणे marathi pronoun types 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार उदाहरणे marathi pronoun types 

नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात

रमेश ने जेवण केले. नंतर तो शाळेत गेला आणि तो शाळा सुटल्यावर घरी आला.

वरील वाक्यात “तो” हे सर्वनाम आहे.

मराठीमध्ये एकूण मूळ सर्वनामे ९ आहेत ते पुढील प्रमाणे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः

सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत .

1. पुरुषवाचक सर्वनाम

2. दर्शक सर्वनाम

3. संबंधी सर्वनाम

4. प्रश्नार्थक सर्वनाम

5. अनिश्चित / सामान्य सर्वनाम

6. आत्मवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात

1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मी, आम्ही, आपण, स्वतः

➡️मी मुंबईला गेलो.

➡️आम्ही नागपूरला गेलो.

2) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

तू, तुम्ही, आपण, स्वतः

➡️तू शेतात जा

➡️तुम्ही शेतात जा

➡️आपण शेतात या

3) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

तो, ती, ते. त्या

➡️तो विद्यार्थी आहे

➡️ते खेळाडू आहेत

4) दर्शक सर्वनाम

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात.

तो, ती, ते, हा, ही, हे

➡️तो माझा मुलगा आहे.

➡️ही माझी बहिण आहे.

6) संबंधी सर्वनाम

दोन गोष्टीतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात

जो-जो जे-ते जी-ती जो, जी, जे, ज्या

जो अभ्यास करतो तो पास होतो

➡️जे चकाकते ते सोने नसते

➡️ज्याने करावे त्याने भरावे

7) प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. त्यास प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात.

कोण, काय

➡️भारताचे पहिले पंतप्रधान कोण?

➡️तुझे आडनाव काय?

8) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामः

कोण काय है सर्वनाम वाक्यात नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे निश्चित सांगता येत नाही म्हणून त्या सर्वनामाला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. या सर्वनामाचा वाक्यात प्रश्न विचारासाठी उपयोग करत नाही

➡️त्या बॉक्समध्ये काय आहे ते सांगा.

9) आत्मवाचक सर्वनाम

जेव्हा आपण या पुरुषवाचक सर्वनामाचा वापर स्वतः या अर्थाने होतो त्यास आत्मवाचक सर्वनाम म्हणतात

➡️मी स्वतः त्यांना पाहिले

➡️तो स्वतःहून मला भेटला

➡️तो आपणहून घरी आला

Related posts:

Leave a Comment