मराठी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ marathi vakyaprachar artha
गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे
कान निवने – ऐकून समाधान होणे
कान पिळणे – अद्दल घडवणे
कान फुंकणे – चहाडी करणे
कानाने हलका असणे – कशावरही पटकन विश्वास ठेवणे
कानाला खडा लावणे – एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे
कानोसा घेणे – अंदाज घेणे चाहूल घेणे
काना मागे टाकणे – दुर्लक्ष करणे
कानावर हात ठेवणे – नाकबूल करणे
केसाने गळा कापणे – घात करणे
कानी कपाळी ओरडणे – एकसारखे बजावून सांगणे
कानावर घालणे – लक्षात आणून देणे
गळ्यातला ताईत होणे -अत्यंत आवडता होणे
कानावर येणे – सहज ऐकू येणे
गळ्यापर्यंत बुडणे – कर्जबाजारी होणे
गळा गुंतणे -अडचणीत सापडणे
गळा काढणे – मोठ्याने रडणे
चेहरा खुलने – आनंद होणे
चेहरा पडणे – लाज वाटणे
छातीधडपणे – घाबरून जाणे
जीव की प्राण असणे- खूप आवडणे.
डोके फिरणे – राग येणे
डोके घालणे – लक्ष देणे.
डोके चालवणे – बुद्धी चालवणे.
डोळ्यांत खुपणे – सहन न होणे
डोळ्यांत धूळ फेकणे – खोटे नाटे सांगून फसवणे
जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलने
जिभेला हाड नसणे – वाटेल तसे बोलणे