इयत्ता ६ वी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी २०२६ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे यासाठी प्रसिद्धी देण्याबाबत navoday exam pravesh pariksha
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की. जवाहर नवोदय विद्यालय प्रशासन, महाराष्ट्र राज्य, इयत्ता ६ वी साठी २०२६ च्या प्रवेशासाठी प्रवेश चाचणी आयोजित करत आहे. ही परीक्षा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी घेतली जाईल. प्रवेश चाचणीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ जुलै २०२५ आहे.
सदर प्रवेश चाचणीसाठी अर्ज फॉर्म भरताना परीक्षा फी मोफत असून, विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात येते.
आपल्या प्रशासनाच्या वतीने, खालील बाबी सुनिश्चित कराव्यातः
> सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या चाचणीविषयी माहिती देण्यात यावी.
> विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आणि संबंधित तांत्रिक प्रक्रिया याबद्दल मार्गदर्शन करण्यात यावे.
> विद्यार्थ्यांना प्रवेश चाचणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती वेळेत देण्यात यावी.
> विद्यार्थ्यांचे वर्गवारी आणि इतर संबंधित गोष्टींचा सर्वेक्षण करून अधिकाधिक अर्ज भरण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या स्तरावरून यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना या प्रवेश चाचणीसाठी जास्तीत जास्त संधी मिळवून देणे हे आपले महत्त्वाचे कार्य आहे.