राज्यातील शाळांचे पटपटताळणी करणे बाबत patpadtalni paripatrak
संदर्भ- मा. संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचे पत्र १८२०१२९ दिनांक ३१ मार्च २०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पट पडताळणी करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
१ इयत्ता दहावी व इयत्ता बारावी विद्याथ्यांची पट पडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही
ग्राह्य धरण्यात येईल.
२ उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, गैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील ११ वी वर्गाचे प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. शैक्षणिक सत्र 25-26 मध्ये इयत्ता ११ मधील विद्याध्यर्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पट पडताळणी करण्यात यावी.
३ इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या दिवशी दिनांक म्हणजेच ११-०४-२०२६,१५-०४-२०२६ व २२-०४-२०२६ रोजी करण्यात यावी
४ इयत्ता नववीच्या वर्गाच्या बाबतीत पट पडताळणी उपलब्ध तारखांच्या ११-०४-२०२६,१५-०४-२०२६ व २२-०४-२०२६ रोजी करण्यात यावी.
५ राज्यातील शाळांमधील पट पडताळणी दिनांक ११-०४-२०२६,१५-०४-२०२६ व २२-०४-२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने नववीचे मराठी, गणित, इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षा अनुक्रमांक ११-०४-२०२६,१५-०४-२०२६ व २२-०४-२०२६ रोजी आयोजित करण्यात यावेत.
६ इयत्ता अकरावीच्या बाबतीत मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयाची वार्षिक परीक्षा सुद्धा अनुक्रमे दिनांक ११-०४-२०२६,१५-०४-२०२६ व २२-०४-२०२६ रोजी आयोजित करण्यात यावे जेणेकरून सर्व माध्यमिक शाळा मधील इयत्ता दुसरी ते नववी इयत्ता अकरावीची पट पडताळणी उपरोक्त तीन दिवशी पूर्ण होईल
७ राज्यातील शाळांचे पट पडताळणी करण्याच्या अनुषंगाने स्टुडन्ट पोर्टल बरती मुख्याध्यापक लॉगिन, क्लस्टर हेड लॉगीन, गट शिक्षणाधिकारी लॉगीन व शिक्षणाधिकारी लीगीन वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. पट पडताळणीच्या अनुषंगाने शाळेत भेट देणारे पथक उपरोक्त लॉगिन चा वापर करून हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील या सुविधेचाबत सविस्तर माहिती सूचना आपणास 7 एप्रिल 2026 रोजी किंवा तत्पुरती कळविण्यात येईल.
८ राज्यातील शाळांची पट पडताळणी करण्यासाठी पुरेशी मनुष्यचळ आवश्यक आहे त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक योजना), लेखाधिकारी, अधीक्षक शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायटच्या अधिव्याख्याता / वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक वेतन अधीक्षक, विस्तार अधिकारी संवर्ग याची नेमणूक शाळेत भेट देणारे पथक म्हणून करावी शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पट पडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.
शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांनी शाळा निहाय पट पडताळणीचे नियोजन आपल्या पातळणीवरून एकत्रितपणे करावे अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच पुणे विभागातील पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांची सोबत सादर करण्यात येत आहे आपल्या स्तरावरून भेटीचे नियोजन करून या कार्यालयास अवगत करावे.





![Correction in Particulars for the National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-Reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/03/Screenshot_2026_0311_201649-150x150.jpg)



