RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणी लिंक व आवश्यक कागदपत्रे व सुधारित सूचना परिपत्रक right to education addmission 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणी लिंक व आवश्यक कागदपत्रे व सुधारित सूचना परिपत्रक right to education addmission 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रक्रियेबाबत सुधारित सूचना

संदर्भ:-शासन निर्णय क्र आरटीई-२०२५/प्र.क्र/०८/एसडी-१/दि.१२/२/२०२६

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के सन २०२६-२७ या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दि.१२/२/२०२६ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रकिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

ऑनलाइन अर्ज भरणे कालावधी व लिंक

बालकांच्या पालकांकडून आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१७/२/२०२६ ते दि.१०/३/२०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना

१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी)

(१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थ सहाय्यित शाळा/विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये इयत्ता १ ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm portal या संकेत स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी.

२. वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो.

३. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.

४. बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून ०१ किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा आरटीई पोर्टलवर दिसतील.

५. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी.

६. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंवचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनव्दारे निवास्थनाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.

७. प्रवेशप्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी.

८. अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी

९. प्रवेशप्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे.

१०. पालकांना ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, बालकांचा जन्मदिनांक, उत्पन्नचा प्रमाणपत्र, दिव्यांगाचा प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र इ.)

११. ज्या बालकांना यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.

१२. यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल तसेच पालकांना एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.

१३. बालकांच्या पालकांनी आरटीई २५ टक्के अंतर्गत

ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे

बालकांच्या पालकांचे आई किंवा वडीलांचे आधारकार्ड अनिवार्य (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड अनिवार्य

बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य)

भाडे तत्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकाना अनिवार्य)

सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही)

आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्नचा दाखला रूपये १ लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन २०२३-२४ किंवा २०२४-२५) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राहय समजण्यात येईल.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment