सन 2025-26 संच मान्यताबाबत sanchamanyata
संदर्भ :- 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक एसएसएन-2015/(प्र.क्र.16/15)/टीएनटी-2, दि. 15.03.2024, दि. 19.09.2025 व दि.09,10,2025
2. शासन पत्र दि.21.02.2025 व दि. 26,03,2025
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.15.03.2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासन पत्र दि.21.02.2025 व दि.26.03.2025 मधील निर्देशानुसार दि.20.10.2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राहय धरुन सन 2025-26 च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका (युजर मॅन्युअल) नुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संचमान्यता डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) करुन शाळांना उपलब्ध करुन दयाव्यात. ज्या शाळांची पायाभूत पर्दाबाबत (Base Post) अडचणी असतील त्या बाबत तात्काळ प्रतिसाद दयावा.
तसेच सर्व संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामळे त्रटी असलेल्या शाळांची जिल्हानिहाय यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तात्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी. व आपल्या जिल्हयातील सर्व शाळांची संचमान्यता दि. 15.01.2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यकती कार्यवाही करावी.
विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्हयातील सन 2025-26 च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांचे वेतन अदा होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी.











