सन २०२५-२०२६ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान तिसरा व अंतिम टप्पा 25% टक्के वितरित करणेबाबत sanyukta shala anudan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२०२६ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय प्राथमिक शाळांसाठी संयुक्त शाळा अनुदान तिसरा व अंतिम टप्पा 25% टक्के वितरित करणेबाबत sanyukta shala anudan

संदर्भ :-

1) भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि.०2/05/२०२८ रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मंजूरीनुसार

2) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/से.शा.अ./2025-26/1947, दि. 8 जुलै, 2025. (मार्गदर्शक सूचना)

Download

3) या कार्यालयाचे मप्राशिप/सशि/लेखा/Compo. School Grant/ SEC Ree (GEN,SC,ST)/2025-26/2818, दि. 18 सप्टेंबर 2025.

4) या कार्यालयाचे मप्राशिप/सशि/लेखा/Compo. School Grant/ELE & SEC.Rec(GEN,SC,ST)/2025-26/3648, दि. 02 डिसेंबर, 2025.

5) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/ सं.शा.अ./2025-26/3695, दि. 5 डिसेंबर, 2025. (50% प्राथमिक 50% माध्यमिक शाळा)

6) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप सशि/लेखा/ Compo. School Grant/ELE & SEC.Ree (GEN, SC, ST)/ 2025-26/579, दि. 17 फेब्रुवारी, 2026

7) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप सशि/लेखा/ Compo. School Grant/ELE & SEC.Rec(GEN,SC,ST)/2025-26/1275, दि. 29 मार्च, 2026

उपरोक्त विषयान्वये, समग्र शिक्षा अंतर्गत सन 2025-26 च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या दि. 02/05/2025 रोजीच्या बैठकीत PMSHRI पहिला टप्पा 516 च दुसरा टप्पा 311 अशा एकूण (827) शाळा वगळून संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजूरी मिळाली

आहे. सन 2025-26 मध्ये सर्वात वरची इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या एकूण 62493 शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी एकूण रु. 15659.5 लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे. तसेच इयत्ता 10 वी किंवा 12 वीचा वर्ग असलेल्या एकूण 1741 शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांसाठी एकूण रु. 1009.6 लाख तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

संदर्भिय 3 अन्वये माध्यमिक करिता 50% निधी पाठविला आहे. संदर्भिय 4 व 5 अन्वये माध्यमिक व प्राथमिक 50% टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. संदर्भिय पत्र क्र. 6 अन्वये प्राथमिक स्तराकरिता 25% निधी जिल्हा व मनपा स्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

उपरोक्त नमूद प्रमाणे प्राथमिक 62493 शाळांकरीता एकूण निधी म्हणजे रु. 156,59,50,000/- इतका निधी पैकी संबंधित जिल्हा परिषद / महानगरपालिका यांना 75% निधी वितरीत करण्यात आला असल्याने तसेच संदर्भिय पत्र क्र. 7 नुसार वितरित करण्यात आलेला निधी रक्कम रु. 9,78,71,875/- इतका संबंधित जिल्हा परिषद/ महानगरपालिका यांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

प्राथमिक स्तराच्या वर्ग असलेल्या शाळांसाठी मंजूर निधी व 25% वितरीत करावयाच्या निधीचा तक्ता खालीलप्रमाणे आहे:-

संयुक्त शाळा अनुदान (प्राथमिक)

जिल्ह्यांना / महानगरपालिकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा ज्या शाळांचा खर्च होईल अशाच शाळांना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात यावा. तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत आणि शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी. समग्र शिक्षा अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व जिल्हा व महानगरपालिका यांनी सदरचा निधी प्राप्त होताच तात्काळ सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र अ नुसार खर्च करुन प्रबंध पोर्टलवर माहित्ती अद्यावत करण्यात यावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हे व प्रशासनाधिकारी/ शिक्षणाधिकारी, महानगरपालिका, सर्व महानगरपालिका यांना सूचना देण्यात याव्यात.

तथापि, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या एकूण मंजूर तरतूदीच्या मर्यादेत तसेच शाळांना मंजूर असलेल्या तरतूदीच्या मर्यादेत खर्च होईल याची दक्षता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे व आयुक्त, महानगरपालिका, सर्व महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावरुन घ्यावी.

शासन परिपत्रक pdf download 

मूळ प्रत मा. राज्य प्रकल्प संचालक यांच्या मान्यतेने

Related posts:

Leave a Comment