प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेबाबत scolarship exam application
संदर्भ :
– 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. प्राठशि/प्र.क्र.23/2025(ई-1142170)/एसडी-5, दि. 17/10/2025.
2. शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी सन 2026 ची अधिसूचना दि. 30/12/2025.
3. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेली आढावा बैठक दि. 21/01/2026 व 02/02/2026.
4. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2026/276, दि. 28/01/2026.
5. मा. मंत्री, शालेय शिक्षण व मा. आयुक्त (शिक्षण) यांनी घेतलेली आढावा बैठक दि. 13/02/2026.
उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन 1954-55 या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करणारी ही परीक्षा असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याने शालेय स्तरावरच या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये प्रवेश घेतात, शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अशा महाराष्ट्र राज्यातील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळत असल्याने सदर विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते. या मुख्य उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा इ. 1 ली पासूनच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहून तयारी करून घेत असल्याने विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणाऱ्या भाषा व गणित या कठीण वाटणाऱ्या विषयांमध्ये तरबेज होऊन त्याची स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने पायाभरणी होते, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होऊन आपली गुणवत्ता सिध्द करण्याची संधीही मिळते.
वरील सर्व बाबींचा साकल्याने विचार होऊन सन 2025-26 पासून घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) सन 2026 साठी जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविणेसाठी जिल्हा स्तरावरून विशेष प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.
संदर्भ क्र. । च्या शासन निर्णयास अनुसरून संदर्भ क्र. 2 नुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक अधिसूचना दि. 30/12/2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळाबर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरणेसाठी दि. 28/02/2026 ही मुदत देण्यात आली आहे.
तथापि परीक्षा परिषदस्तरावरून सदर परीक्षेसाठी विद्यार्थी सहभाग आवेदनपत्र नोंदणीबाबतचा आढावा घेतला असता अनेक जिल्ह्यांमध्ये स्थिती उदासीन असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. सरलनुसार जिल्ह्यातील नोंद असलेल्या शाळांपैकी अनेक शाळांनी सदर परीक्षेकरीता नोंदणी केलेली नाही किंवा विद्यार्थी आवेदनपत्रही
भरलेले नाही. या अथर्थी दि. 17/10/2025 च्या शासन निर्णयास अनुसरून शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरणेच्या दृष्टीने शाळांचे उद्बोधन होणे आवश्यक आहे. संदर्भ क्र. 5 नुसार झालेल्या आढावा बैठकीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 साठी प्रविष्ठ झालेल्या विद्याथ्यांची संख्येबाबत मा. मंत्री, शालेय शिक्षण व मा. आयुक्त (शिक्षण) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शासन निर्णय दि. 17/10/2025 यातील मुद्दा क्र. 6 व 7 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे, त्यानुसार सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात आली असून सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मुल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात / गोपनीय अहवालात करण्यात येणार असल्याचेही नमूद आहे. शासन धोरणाच्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त जिल्हा परिषद / मनपा शाळांतील 100% विद्यार्थी प्रविष्ठ करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या लेखी सूचना निर्गमित व्हावेत, जेणेकरून संदर्भ क्र. 1 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.









