शब्दसिद्धी तत्सम, तद्भव, देशज, परभाषीय शब्द shbdshiddhi words
शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतात.
शब्दांचे तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय चार प्रकार आहेत ते खालील प्रमाणे
(१) तत्सम शब्द –
‘कवि, मधु, गुरू, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव’ यासारखे शेकडो शब्द संस्कृत भाषेतले असून ते जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपांत काही फरक न होता मराठी भाषेत आले आहेत. अशा शब्दांना ‘तत्सम’ असे म्हणतात.
उदा. पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, ओठ, अग्नि, नदी, कमल इत्यादी.
(२) तद्भव शब्द –
संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपांत बदल होऊन तद्भव शब्द तयार होतात.
उदा. (कर्ण) कान, (चक्र) चाक, (अग्नि) आग, (पर्ण) पान, (विनती) विनंती वगैरे. या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपांत बदल होऊन ते मराठीत आलेले आहेत, त्या शब्दांना ‘तद्भव शब्द’ असे म्हणतात.
पाय (पद), भाऊ (भ्रातृ), घर (गृह) सासू (स्वस्), सासरा (वशुर), गाव (ग्राम), दूध (दुग्ध), घास (ग्रास), कोवळा (कोमल), ओठ (ओष्ठ), काम (कर्म),घाम (धर्म)
(३) देशी किंवा देशज –
जे शब्द तत्सम किंवा तद्भव किंवा परभाषीय नाहीत ते आपल्या बोली भाषेतील आहेत त्यांना देशी किंवा देशज शब्द म्हणतात
. उदा. डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर झाड, दगड, धोंडा, घोडाइत्यादी.
(४) परभाषीय शब्द –
स्वदेशी किंवा परप्रांतीय किंवा विदेशी भागातून आलेल्या शब्दांना परभाषिय शब्द म्हणतात.
(१) इंग्रजी – बॅट, बॉल, टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेल्वे, बस, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन,
(२) पोर्तुगीज – पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस, बटाटा
(३) फारशी – हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर
कामगार, गुन्हेगार, फडनवीस इत्यादी.
(४) अरबी – अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर
स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)
(१) कानडी – अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची, कांबळे, खलबत्ता,
(२) गुजराती – घी, दादर, शेट, दलाल,
(३) तामिळी- चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी.
(४) तेलुगु – ताळा, अनरसा, किडूकमिडूक,
(५) हिंदी – भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास,
सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय
सिद्ध
‘जा, ये, कर, बस, बोल, पी’ यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात. त्यांना ‘सिद्ध शब्द’ असे म्हणतात.
साधित शब्द’
‘कर’ या सिद्ध शब्दापासून ‘करू, करून, कर्ता,करणारा, होकार, प्रतिकार’ यांसारखे शब्द बनवितात, त्यांना ‘साधित शब्द’ असे म्हणतात.
मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवितात. या अक्षरांना ‘उपसर्ग’ असे म्हणतात.








