माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाचे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्राबाबत ssc marks list certificate
संदर्भक.रा.मं./परीक्षा ७/१३३७/दिनांक २५.०३.२०२६ रोजीचे राज्य मंडळ, पुणे यांचे पत्र
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्य मंडळ, पुणे यांच्या दिनांक १२.०२.२०२६ रोजीच्या कार्यकारी परिषद ठराव कमांक १४४ नुसार फेब्रु/मार्च २०२६ परीक्षेपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ती ‘एकत्रित’ (Consolidated) देण्यात येणार आहे. तसेच एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव First Name. Father Name व Surname या कमाने छपाई करण्यात येणार आहे. सदर कमाच्या अनुषंगाने कोणत्याही विद्यार्थ्यांच्या नावात First Name, Father Name व Surname त्रुटी उदभवणार असल्यास त्याबाबतची दुरूस्ती आपल्या स्तरावर न झाल्यास मंडळामार्फत तातडीने करून घेण्यात यावी.
यासंदर्भात फेब्रु/मार्च २०२६ च्या प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास, त्यावर योग्य फोटो चिटकवून संबंधित मुख्याध्यापक यांनी स्वाक्षरी करण्याचे निर्देश यापुर्वी देण्यात आलेले आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरूस्त केलेले आहेत, त्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर अचूक छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे. त्याकरिता मंडळाच्या संकेतस्थळावर ‘Photo Correction’ ही लिंक कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याव्दारे फोटो दुरूस्ती करण्यात यावी.










