शिक्षक पात्रता परीक्षेबाबत teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत teacher eligibility test 

संदर्भ :

१) निर्णय क्र. आरटीई-२०१०/प्र.क्र.२७२/प्राशि-१ दि. १३ फेब्रुवारी, २०१३.

२) राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदचे मार्गदर्शक सूचना क्र. ७६४/२०१०/NCTG/Acad दि. ११ फेब्रुवारी, २०११

३) शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३०/टीएनटी-१ दि. २४.०८.२०१८

४) संदर्भ क्र. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे पत्र क्र. मरापप/बापवि /२०१९/६४९४ दि. ०३ ऑक्टोबर, २०१९

आपले संदर्भाधिन दिनांक ०३.१०.२०१९ चे पत्र कृपया पहावे.

०२. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता १ली ते ८ वी च्या शिक्षकांकरीता शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याकरीता पुढील प्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे.

१. इयत्ता १ ली ते ५ वी च्या गटाकरिता प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त करावयाच्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.। उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्टीसाठी शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

३. इयत्ता ६ वी ते ८ वी या गटाकरिता उच्च प्राथमिक शिक्षकांना इयत्ता १ ली ते ५ च्या गटाकरिता नियुक्तीसाठी संबंधित शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.। उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल. म्हणजेच इ. १ ली ते ५ वी आणि इ. ६ वी ते ८ वी या दोन्ही गटासाठी नियुक्तीसाठी पेपर क्र.। व ॥ उत्तीर्ण करणे आवश्यक राहिल.

४. इयत्ता ६ वी ते ८ वी च्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ संबंधित उमेदवाराने त्यांनी प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार राहिल. उदा. विज्ञान / गणित विषयासाठी विज्ञान / गणित विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र.॥, सामाजिकशास्त्र

शिक्षकांसाठी सामाजिकशास्त्र या विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ व इतर विषयांसाठी उपरोक्त गणित/विज्ञान आणि सामाजिकशास्त्र यापैकी कोणताही एका विषयातील शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. ॥ उत्तीर्ण असणे आवश्यक राहिल.

Related posts:

Leave a Comment