TET मानसशास्त्र या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच teacher online test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मानसशास्त्र या घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच teacher online test 

मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहजप्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅक्डुगल या मानसशास्त्रज्ञाने केला त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही अशावेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते.

(1) हास्य

(2) प्रार्थना

(3) परगौरव

(4) निर्मिती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य, खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही ?

(1) वेग

(2) ऊर्जा

(3) प्रेरणा

(4) गुणवत्ता

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

मॅक्डुगल यांनी केलेल्या सहजप्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो?

(1) प्रार्थना

(2) जुगुप्सा

(3) युद्ध

(4) संपादन व निर्मिती

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते हे चे उदाहरण आहे.

① इंद्रियभ्रम

(2) चित्तभ्रम

(3) कल

(4) दृष्टिदोष

या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो.

(1) 8-9

(2) 12-19

(3) 5-6

(4) 15-16

वरील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्ये सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्नप्रकाराचे उद्दिष्ट आहे ?

(1) पूर्तीप्रश्न

(2) अर्थाविष्कार करणारे प्रश्न

(3) निबंधवजा प्रश्न

(4) वस्तुनिष्ठ प्रश्न

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहजप्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅक्डुगल या मानसशास्त्रज्ञाने केला त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही अशावेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते.

(1) हास्य

(2) प्रार्थना

(3) परगौरव

(4) निर्मिती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तनबदल दिसत नाही ?

(1) अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो

(2) व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो

(3) स्वतःची भूमिका तयार करतो

(4) भूतकाळाचा वर्तमानकाळाशी संबंध जोडतो

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही ?

(1) कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे

(2) कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे

(3) कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे

(4) कौमार्यावस्था हे समस्या वय आहे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय 3

सिल्व्हर मॅन’ या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यांनुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

(1) भावनिक उद्दिपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते

(2) भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो

(3) प्रत्येक भावनेत उद्दिपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्यांगाच्या प्रक्रियेत कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो

(4) वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे

(1) मॉरिसन

(2) हर्बर्ट

(3) बॅग्ले

(4) विल्यम जेम्स्

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही?

(1) कुमारावस्थेत मुलामुलींची स्वत्वाची भावना अत्यंत तीव्र असते

2) कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात.

(3) कमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो

(4) कुमारवयातील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मानसशास्त्रातील विविध अभ्यासपद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे?

(1) या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते

(2) मनुष्याला भावना लपविता येतात त्यामुळे निष्कर्षांवर परिणाम होतो

(3) ज्या व्यक्तीवर प्रयोग करावयाचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात

(4) काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

समष्टिवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही?

(1) भौतिक शास्त्रांमध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रातउपयुक्त नाही

(2) अनेक संवेदनांची बेरीज म्हणजे अवबोधन होत नाही

(3) संवेदनांचे आकलन अलग अलगपणे होत नाही

(4) वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तीकडून केले जाते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबितो, हे थॉर्नडाइक यांच्या …. या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे.

(1) चेतक प्रतिचार उपपत्ती

(2) अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती

(3) मर्मदृष्टीमूलक उपपत्ती

(4) क्षेत्रीय उपपत्ती

Related posts:

Leave a Comment