चालू शैक्षणिक सत्रातील बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत teacher online transfer portal
चालू शैक्षणिक सत्रामध्ये काही शिक्षकांच्या बदलीचे आदेश निर्गमित झाले आहेत. या आदेशांची वेळेत अंमलबजावणी करणे आवश्यक असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
यासाठी निर्णय घेण्यात आला आहे की बदलीस पात्र सर्व शिक्षकांना प्रथम सत्र पूर्ण झाल्यानंतर दिवाळी सुट्टीमध्येच कार्यमुक्त करावे. यामुळे विद्यार्थ्यांचा अध्यापनक्रम अखंडितपणे चालू राहील. तसेच, संबंधित शिक्षकांनी प्रथम सत्राच्या अखेरीपर्यंत अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खात्री करून, संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडून (SMC) अनापत्ती नाहरकत प्रमाणपत्र (NOC) घ्यावे. हे प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षणाधिकारी (BEO) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
गट शिक्षणाधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित करावे की SMC प्रमाणपत्र प्राप्त करणे, त्याची पडताळणी करणे व संबंधित शिक्षकांची कार्यमुक्ती ही प्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२५ नंतर व २५ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पूर्ण व्हावी. या निर्णयामुळे बदली आदेशांचे वेळेत पालन होईल तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ही प्रक्रिया संवेदनशीलतेने व जबाबदारीने पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.











