शालेय विद्यार्थ्यांची मुख तपासणी करणेबाबत विनंती अर्ज tobacco free school application

शालेय विद्यार्थ्यांची मुख तपासणी करणेबाबत विनंती अर्ज tobacco free school application 

महोदय,

वरील विषयान्वये सविनय विनंती करण्यात येते की, महाराष्ट्रातील नवी पिढी व्यसनमुक्त राखण्यासाठी आणि त्यांवर व्यसनविरोधी संस्कार होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे आणि सिगरेट आणि अन्य तंबाखू उत्पादने कायदा, २००३ नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ……………..आहे. ही आमची शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात येणार

जागतिक आरोग्य संघटनेच्या तंबाखूमुक्त शाळेसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार ‘शालेय आरोग्य शिक्षणात तंबाखूमुक्तीचा समावेश करणे आहे. त्यामुळे आपण आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू सेवन न करण्याचे फायदे, व्यसन सोडण्याचे उपाय, तंबाखू नियंत्रण कायदा ह्याबाबत माहिती द्यावी आणि विद्यार्थ्यांची मुख तपासणी

करावी ही विनंती आहे.

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेने…

Leave a Comment