शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ? शब्दयोगी अव्ययाचे प्रकार व उदाहरणे types of preposition and examples
वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शविणा-या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. वर, खाली, नंतर, पुढे
शब्दयोगी अव्यय म्हणजे काय?
वाक्यातील जे शब्द स्वतंत्र न येता ते इतर शब्दांना किंवा नामासोबत जोडून येतात, त्यानंतर नवीन शब्द तयार होतो व तो शब्द वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे
१) गावापुढे तलाव आहे.
२) झाडाखाली थंड सावली आहे.
३) माकड फांदीवर बसला.
४) घरामागे बगीचा आहे.
महत्त्वाचे
१) शब्दयोगी अव्यय हा अविकारी शब्द प्रकार आहे.
2) हे शब्द स्वतंत्र असे नाहीत किंवा त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही हे शब्द इतर शब्दांना जोडूनच येतात.
३) शब्दयोगी अव्ययात लिंग, वचन, पुरुष, विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही.
४) शब्दयोगी अव्यय मूलतः क्रियाविशेषण अव्यय आहेत, परंतु शब्दांना जोडून आली की ती शब्दयोगी अव्यय ठरतात.
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार
कालवाचक /कालदर्शक
जेवणाआधी हात पाय धुवून घ्यावे.
आता, आधी, नंतर, पूर्वी, पुढे,पर्यंत, पावेतो इ.
गतिवाचक –
उद्यापासून संचारबंदी लागू होणार आहे.
आतून, खालून, पर्यंत,पासून, मधून इ.
करणवाचक
पावसामुळे नदीला पूर आला.
करून, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगी, हाती इ.
कैवल्यवाचक
सचिनच हे काम करू शकतो.
केवळ, ना, पण, फक्त, मात्र इ.
तुलनावाचक –
अनिताचे अक्षर स्मितापेक्षा सुंदर आहे.
तर, तम, परीस, पेक्षा, मध्ये इ.
दिकवाचक –
माझे पुस्तक मित्राकडे आहे.
कडे, प्रत, प्रति, लागी इ.
परिणामवाचक –
निलेश दिवसभर काम करत असे.
भागवाचक –
विशालला गणित विषयात शंभरपैकी नव्वद गुण मिळाले.
योग्यतावाचक –
आज नेहमीप्रमाणे आईला कामात मदत केली.
जोगा, प्रमाणे, बरहुकूम, योग्य, सम,समान, सारखा इ.
विनिमयवाचक –
सरांनी राकेशऐवजी रमेशला कबड्डी मध्ये घेतले.
ऐवजी, जागी, बदली इ.
व्यक्तिरेखावाचक –
आईशिवाय घरी राहणे अशक्य आहे.
खेरीज, परता, वाचून, विना, व्यतिरिक्त, शिवाय इ.
विरोधवाचक –
कोणीही माझ्याविरुद्ध कारस्थान करू नये.
उलट, उलटे, वीणा, विरुद्ध इ.
स्थलवाचक –
कुशल माझ्याजवळ बसलेला आहे.
आत, अलीकडे, जवळ, ठाई, नजीक, पाशी, बाहेर, मागे, मध्ये, समक्ष, समीप, समोर इत्यादी
साहचर्यवाचक-
निशा बाबाबरोबर बाजारात गेली होती.
निशी, बरोबर, सकट, समवेत, संगे, सवे, सह, सहित इ.
संग्रहवाचक –
राधाही माझ्या घरी अभ्यास करायला आली.
केवळ, देखील, पण, बरीच, सुद्धा, ही इ.
संबंधवाचक –
मी पक्ष्यांविषयी माहिती मिळवली.
विशी, विषयी, संबंधी इ.
हेतूवाचक –
मांजर पाण्यासाठी घरात आली.
अर्थी, करिता, कारणे, निमित्त, प्रित्यर्थ, साठी, स्तव इ.







