“विशेष अभियान ५.०” अंतर्गत विद्यांजली पोर्टलद्वारे शाळांमध्ये रंगकाम, सौंदर्गीकरण व दुरुस्ती उपक्रम राबविण्याबाबत vidhyanjali portal vishesh abhiyan
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिनांक १० ऑक्टोबर, २०२५ च्या पत्रानुसार “विशेष अभियान ५.०” अंतर्गत विद्यांजली पोर्टलद्वारे शाळांमध्ये रंगकाम, सौंदर्गीकरण व दुरुस्ती उपक्रम राबविण्याबाबत………
संदर्भ: १. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे डि.ओ.क्र.4-4/2022-KT, दिनांक १० ऑक्टोबर, २०२५.
२. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांची ऑनलाईन बैठक दि. १४ ऑक्टोबर, २०२५.
३. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार विद्यांजली समन्वयक यांच्याशी दूरध्वनीवरून झालेली चर्चा दि. २४ ऑक्टोबर, २०२५.
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार सूचित करण्यात येते की, भारत सरकारकडून “विशेष अभियान ५.०० हे अभियान २ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश शाळांमधील स्वच्छता, सौंदर्गीकरण, आणि देखभाल व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्तीचे कार्य संस्थात्मक स्वरूपात करावयाचे आहे. त्यानुसार या अभियानांतर्गत पुढील उपक्रम हाती घेण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे.
१. शाळांच्या भिंतींना चुना पांढरी व रंगकाम करणे.
२. शौचालये व पिण्याच्या पाण्याच्या सुविधा कार्यान्वित करणे,
SCERT-50.0/94/2025-SOCIAL SCI
३. वीज व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्ती करणे.
४. स्थानिक कला प्रकारांवर आधारित भित्तिचित्रे व वॉल आर्ट तयार करून शाळेचे
सौंदर्गीकरण करणे.
या उपक्रमासाठी विद्यांजली पोर्टल (https://vidyanjali.education.gov.in) चा उपयोग करण्यात यावा. त्यासाठी खालील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी :
सर्व शाळांनी “Maintenance & Repair” या विभागात उपक्रम नोंदवून स्वयंसेवक किंवा CSR योगदान मागवावे. संबंधित शाळांनी उपक्रम पूर्ण झाल्यावर तो पोर्टलवर “Complete Activity” म्हणून बंद करावा. जिल्हा, तालुका व क्लस्टर स्तरावर SMC, माजी विद्यार्थी, व्यापारी संघटना, CSR संस्था व स्थानिक स्वयंसेवक इ. यांच्या मदतीने उपक्रम पूर्ण करावीत. सर्व शाळांमध्ये उपक्रम १५ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. जिल्हास्तरावर प्रगती अहवाल तयार करून साप्ताहिक स्वरुपात प्रकाशित करावा. अभियानाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ व सोशल मीडिया पोस्ट अधिकृत हँडलद्वारे @vidyanjall_edu व #SpecialCampaign5.0 या टॅगसह प्रसारित कराव्यात.
संदर्भ क्र.२ अन्वये विद्यांजली जिल्हा नोडल अधिकारी (DNO) यांनी “विशेष अभियान ५.०० या अभियानच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेची ऑनलाईन बैठक दि. ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी घेण्यात यावी. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी प्रत्येक शाळेमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल यासाठी वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करण्यात यावेत.






![Inviting online Application Form for National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/02/Screenshot_2026_0208_175316-150x150.jpg)



