उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत vidhyapitha adhyapak bharti
वाचा:-
१. भारताचे राजपत्रः असाधारण, भाग ।।।-विभाग ४, युजीसी नोटिफिकेशन दिनांक १८ जुलै २०१८.
२. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५६/१८/विशि-१, दिनांक ८ मार्च २०१९.
३. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५६/१८/विशि-१, दिनांक १० मे २०१९.
४. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२३०९/प्र.क्र.१२८/विशि-१, दिनांक ५ मार्च, २०२४.
५. मा. राज्यपाल यांचे अवर सचिव (शिक्षण), राजभवन यांचे पत्र क्रमांक आरबी/जीइएन-२०२४/सीआर-९२८/इडीएन.५/१८२, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५.
६. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.ई-८६०४२१/विशि-१, दि. २८ फेब्रुवारी, २०२५.
७. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.ई-८६०४२१/विशि-१, दि. ६ ऑक्टोबर, २०२५.
८. शासन पत्र क्र. एनआयएससी-२०२५/ई-८६०४२१/विशि-१, दि. १८ नोव्हेंबर, २०२५.
९. उपसचिव, राजभवन, महाराष्ट्र राज्य यांचे क्र. RB/Gen-२०२४/CR-९२८/Edn.५/१०३९, दिनांक १२.१२.२०२५ चे पत्र.
१०. शासन पत्र क्र. एआयएससी-२०२५/ई-८६०४२१/विशि-१, दि. १९ डिसेंबर, २०२५.
११. उपसचिव, राजभवन, महाराष्ट्र राज्य यांचे क्र. RB/Gen-२०२४/CR-९२८/Edn.५/९२, दि. ०४.०२.२०२६ चे पत्र.
प्रस्तावना:-
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत दि. ०६.१०.२०२५ च्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रीया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी मा. कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारीत कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रीयेसाठी शासन निर्णय दि. ०६.१०.२०२५ अन्वये कार्यपद्धतीत विहित केलेल्या सुधारणा याद्वारे रद्द करुन सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेली सुधारीत कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.
२. वरील कार्यपध्दतीनुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील सध्या सुरू असलेली अध्यापकांची निवडप्रक्रिया पूर्ण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या राज्य विद्यापिठांमधील अध्यापकांच्या निवड प्रक्रियेकरीता या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०२१११४१६४४११०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










