TET मानसशास्त्र सराव प्रश्नसंच teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मानसशास्त्र सराव प्रश्नसंच teacher eligibility test

किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते, याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी?

१) विद्यार्थ्याच्या त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात.

२) वर्गाच्या शांततेची, सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकावी.

३) विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पहावे.

४) टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाही हे पहावे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढावयास शिकते?

१) बौद्धिक विकासाची अवस्था

२) क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ

३) मूर्त क्रियाकाल अवस्था

४) शब्दपूर्व अवस्था

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

व्यक्तिविकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत; या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे?

१) सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो.

३) सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशिकतेने प्राप्त होतात.

२) विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरविण्याचे काम अनुवंशिकतेकडून होते.”

४) विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

मानसिक वय हा संबोध म्हणजे बुद्धिमापन क्षेत्रातील बीनेची मोठी देणगी होय’ याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही.

२) मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखाच असतो.

३) व्यक्तीच्या जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो.

४) सामान्यतः जन्मवयाच्या १६ व्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडतांना स्पिअरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

१) बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांचे परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असते.

२) मज्जातंतूंमधील प्रक्रिया गुंतागुंतीच्या आहेत.

३) बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत.

४) एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मज्जातंतूंमधील प्रक्रियेवर अवलंबून आहे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांचे प्रसंगानुरूप प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन होणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. या विषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख होणे गरजेचे असते.

२) भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असते.

३) एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते.

४) इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही?

१) अवधान ही निवडक प्रक्रिया आहे.

२) अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते.

३) अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही.

४) अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असतांना त्याच्या संवेदनाचे वर्गीकरण खालील पैकी कोणत्या रचनेत होईल?

१) समीपता

२) साधर्म्य

३) सातत्य

४) पूर्णत्व

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही?

१) आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जाप्रक्रिया काही काळपर्यंत चालू राहते.

२) धारणा निरनिराळ्या पातळीवर असते

३) कोणत्याही व्यक्तीची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही.

४) एका विषयाचे पठन संपताच दुसऱ्या विषयाचे पठन सुरू केले की धारुण्णपु चांगली होते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

खालीलपैकी कोणते उदाहरण निर्मायक विचाराचे नाही?

१) शास्त्रज्ञ शोध लावतात.

२) शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात.

३) शिक्षक उद्‌गामी पद्धतीने शिकवतात.

४) शिक्षक निसर्गचित्र काढतात.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

खाली दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

१) पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात.

२) इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट व अचूक हवेत.

३) मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात.

४) ज्ञान ग्रहणात संबोध फार महत्त्वाचे आहेत.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक  3

प्रतिमेचे प्रकार व त्यांचे उदाहरण यांच्या जोड्यांचा योग्य पर्याय कोणता?

(i) गतिप्रतिमा

(अ) मखमलीचा मऊपणा जाणवणे

(ii) स्वाद प्रतिमा

(ब) कचराकुंडीच्या जवळून जातांना नाकाला रूमाल लावणे

(iii) गंध प्रतिमा

(क) वाहनांच्या वेगाची तुलना करणे

(iv) स्पर्श प्रतिमा

(ड) अन्नाची चव लक्षात राहणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक

जेव्हा अध्ययनकर्ता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देतांना पुर्वानुभवाचा उपयोग करतो तसेच नवीन नवीन परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेला प्रतिसाद तो नवीन परिस्थितीत देतो तेव्हा थॉर्नग्डाईकच्या कोणत्या उपनियमाचा वापर केला जातो?

१) प्रतिक्रियांच्या वैविध्याचा नियम

२) प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम

३) मांडणी किंवा रचना

४) घटकांची पूर्वशक्ती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

डॉ. आर्मस्ट्राँग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयोगी ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती होय ?

१) संशोधन पद्धती

२) परिसंवाद पद्धती

३) समवाय पद्धती

४) समालोचन पद्धती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

Related posts:

Leave a Comment