मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिन्याचा कार्यकाल पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे तसेच येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी १०% आरक्षणात समाविष्ट करणेबाबात mukhyamantri yuva karya prashikshan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिन्याचा कार्यकाल पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे तसेच येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी १०% आरक्षणात समाविष्ट करणेबाबात mukhyamantri yuva karya prashikshan 

संदर्भ : १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१०/व्यशि-३ दिनांक ०९ जुलै, २०२४

२. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्र. कौविउ २०२४/प्र.क्र. ११८/प्रशा-

२. दिनांक १० मार्च २०२५

३. श्री. बाळकृष्ण नारायण हूड व इतर ३९ प्रशिक्षणार्थ्यांचे निवेदन दिनांक १९/०१/२०२६

मा. महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरुन सादर करण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय १ व २ प्रमाणे ११ महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी संदर्भ क्र.३ नुसार विषयांकीत प्रमाणे या कार्यालयास निवेदन सादर केले आहे.

सदर निवेदनाद्वारे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी शासकीय भरतीमध्ये १०% समांतर आरक्षण लागू आहे. तशा प्रकारचे आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनांमध्ये कार्यप्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणाध्यर्थ्यांना लागू करावे, तसेच अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२५ उत्तीर्ण झालेल्या युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक भरती मध्ये प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी केली आहे.

वरील विषय धोरणात्मक बाबीशी संबंधीत असल्याने पुढील कार्यवाहीस्तव यासोबत सविनय सादर.

सोबत : संदर्भिय निवेदन

आपला विश्वासू,

Related posts:

Leave a Comment