बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ प्रक्रियेसाठी बुधवार, दि.१८-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०२५/प्र.क्र.०८/एसडी-१, दि. १२-०२-२०२६
२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई-२५टक्के/टे-८०१/२०२५/१७२३५१६, दि. १३-०२-२०२६
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा या शाळांमध्ये आरटीई २५ टक्के सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दि. १२-०२-२०२६ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविणेबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रिय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
बालकांच्या पालकांकडून आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १७-०२-२०२६ ते दि. १०-०३-२०२६ या कालावधीपर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तरी आपणास कळविण्यात येते की, आरटीई २५ टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बुधवार, दि. १८-०३-२०२६ पर्यंत मुदतवाढ येत आहे. याबाबत आपल्यास्तरावरुन संबंधितांना कळविण्यात यावे.










