TET शिक्षक पात्रता परीक्षा पाठ्यक्रम (Syllabus) व प्रश्नपत्रिका आराखडा pdf उपलब्ध teacher eligibility test syllabus

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET शिक्षक पात्रता परीक्षा पाठ्यक्रम (Syllabus) व प्रश्नपत्रिका आराखडा pdf उपलब्ध teacher eligibility test syllabus 

शिक्षक पात्रता परीक्षा पाठ्यक्रम (Syllabus) व प्रश्नपत्रिका आराखडा

संदर्भ :- शात्तन निर्णय क्र. आरटीई २०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१ मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई ३२ दिनांक २३ ऑगस्ट २०१३

प्रश्नपत्रिका आराखडा :-

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

प्राथमिक स्तर [पेपर एक।] इ.१ली ते इ.५वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

उच्च प्राथमिक स्तर [पेपर दोन ॥] इ.६वी ते इ.८वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी

प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

पेपर (१) प्रश्नपत्रिका आराखडा व प्रश्नाचे स्वरुप

एकूण गुण १५०

कालावधी – २ तास ३० मिनिटे

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती

१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्र:-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात. येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विदयार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्टये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

२) भाषा-१ व भाषा – २

या परिक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील,

इ.१ली ते ५ वी प्रचलित अनुलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील.

३) गणितं :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दयांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ.१ली ते इ.५वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

४) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीक शाख, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्रीय ज्ञान या मुद्दयांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ.१ली ते इ.५वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ.१ली व इ.२री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ.३री ते इ.५वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरीक शास्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर,

माध्यमिक शालांत परिक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची रिहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर (२) प्रश्नपत्रिका आराखडा व प्रश्नाचे स्वरुप

 (इ.६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

गुण – १५०.

कालावधी – २ तास ३० मिनिटे

पेपर ॥ मधील अ.क्र.१ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र. ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

१) बालमानसशाख व अध्यापनशात्र :-

या विषय्णच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशात्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विदयार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशि देये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती. गुल्यमापन पद्धती यावर आबारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाप्ती सबंधित प्रचलित बी. एड्ः अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

(२) भाषा – १ तसेच (३) भाषा-२

या परिक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

इ.६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा

पाठ्यक्रम लागू र।हील.

४ अ) गणितं व विज्ञान विषय गट-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण अमला, गुणित व विज्ञानाचे अध्याण्न शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट –

सामाजिक शाखासाठी एकूण ६० गुणांचे ६० प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पन, आशय व अध्यापन शाखीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ.६वी ते इ.८वी च्या अभ्यासक्रमावर मधील

संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर,

उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी वं पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२

वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment