महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मध्ये नमुद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत sevajeshthata amalbajavani
संदर्भः १) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, दि. २५ मार्च २०२३, असाधारण क्रमांक ९९, शालेय शिक्षण विभाग, दि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना.
२) शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३२०/टिएनटि-१ दि.२८.०१.२०२५
३) मा. उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचीका क्र. ३८४५/२०२४ व इतर मधील आदेश दि.११.०२.२०२५.
४) शासनाचे पत्रक संकीर्ण २०१६/प्र.क्र.३२०/टिएनटि-१ दि.२३.०१.२०२६.
५) श्री. मा. नागो गाणार, माजी आमदार शिक्षक आमदार यांचे दि. २७.०२.२०२६ चे निवेदन,
६) संचालनालयाचे पत्रक्र. शिरांमा-२०२६/सेवाजेष्ठता/टि-४/१७७८८६६ दि.१२.०३.२०२६
उपरोक्त संदर्भिय क्र.५ अन्वये श्री. मा. नागो गाणार, माजी आमदार शिक्षक आमदार वांचे दि.२७.०२.२०२६ चे निवेदन. जोडले आहे.
सोबत आपणांस कळविण्यात आले होते की, संचालनालयाचे संदर्भ क्र.६ अन्वये कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले होते. तरी पुनश्चः या सुधारित पत्राव्दारे आपणांस कळविण्यात येते की, शासन अधिसूचना दि.२४.०३.२०२३ अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळांतील (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मधील अनुसूची “फ”, परिच्छेद २ मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तसेब शासन निर्णय दि.२८.०१.२०२५ अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये नमुद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदीचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे तसेच संदर्भ क्र.४ अन्वये शासनाचे पत्र दि.२७.०२.२०२६ अन्वये तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सेवाजेष्ठतेबाबत अधिसुचनेनुसार व शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
सेवाजेष्ठतेबाबत परिपत्रक येथे पहा pdf download









