राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेच्या नामाभिधानाबाबत namabhidhan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेच्या नामाभिधानाबाबत namabhidhan paripatrak 

:-

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. मराशै-२०१९/प्र.क्र.९७/प्रशिक्षण, दि. २९ नोव्हेंबर, २०१९.

प्रस्तावना:-

उपरोक्त दि. २९ नोव्हेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये “महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद” या संस्थेचे मराठी भाषेत नाव, “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र” व इंग्रजी भाषेत “State Council for Educational Research and Training, Maharashtra” असे करण्यात आले होते.

२. भारत सरकारच्या अधिनस्त National Council of Educational Research and Training (NCERT) या संस्थेच्या नामकरणात देखील “of” शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. याच धर्तीवर देशातील इतर राज्यांमध्येही संबंधित संस्था “State Council of Educational Research and Training (SCERT)” या नावानेच कार्यरत आहेत. सदर वस्तुस्थिती विचारात घेता दि.२९ नोव्हेंबर, २०१९ च्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक-

शासन निर्णय दि. २९ नोव्हेंबर, २०१९ मध्ये नमूद “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र” या संस्थेचे इंग्रजी भाषेतील नाव “State Council for Educational Research and Training, Maharashtra” याऐवजी “State Council of Educational Research and Training, Maharashtra” असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०३२५१७३९५४०५२१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment