प्रलंबित संचमान्यता पोस्ट मॅपिंग ची कार्यवाही पूर्ण करणे बाबत sanchmanyata post mapping
संदर्भ:-
१. शक्षण संचालनालय (माध्य. व उ.माध्य) यांचे पत्र क्राशिसंमा-२०२३/ टि-७/शालार्थ /संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४२४/ दि १९.०१.२०२३
२. शक्षण संचालनालय (माध्य.व उ.माध्य) यांचे पत्र क्राशिसंमा-२०२३/ टि-७/शालार्थ /संचमान्यता/पोस्ट मॅपिंग/४३७१/ दि २५.०८.२०२३
३. शक्षण संचालनालय (माध्य. व उ.माध्य) यांचे पत्र काशिसंमा-शिक्षक शिक्षकेत्तर/संचमान्यता / पोस्ट मॅपिंग/२०२५/टि-७/१३७८/ दि २०.०३.२०२५
४. शक्षण संचालनालय (माध्य.व उ.माध्य) यांचे पत्र क्रः शिसंमा-२०२४/टि-७/शालार्थ//पोस्ट मॅपिंग/२३९९/०९.०५.२०२५.
५. शक्षण संचालनालय (माध्य.व उ. माध्य) यांचे पत्र क्रः शिसंमा-२०२४/टि-६/शालार्थ//पोस्ट मॅपिंग/५२०९/११.११.२०२५.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये संचमान्यता पोस्ट मॅपिंगनुसार अनुदानित शाळेतील पोस्ट मॅपिंग बाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तथापी सोबत जोडलेल्या विवरणानुसार अद्यापही राज्यातील एकुण-२२२१ शाळा अनमॅप दिसत आहेत. करीता संबंधित अधिक्षक वेतन पथक (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी आपल्या जिल्हयातील मुख्यध्यापक यांना सुचित करुन प्रलंबित पोस्ट मॅपिंगची कार्यवाही दि.०८.०५.२०२६ रोजी पर्यंत पूर्ण करावी अन्यथा यांस जबाबदार (डी.डी.ओ) यांच्या विरुध्द कारवाई प्रस्ताववित करण्यात येईल याची नोद ध्यावी.











