राष्ट्रीय जनगणना 2027 मध्ये प्रगणक जेथे नोकरी करतात ते गाव किंवा शहरचा भाग देण्याबाबत national census
संदर्भउपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांचे निवेदन जा.क्र. 217/2026, दि. 27.04.2026
उपरोक्त विषयांकित संदर्भिय निवेदनाव्दारे राष्ट्रीय जनगणना प्रथम चरण चे प्रशिक्षण सुरु आहे. त्यात बहुतेक प्रगणक यांना त्यांचे कार्यालय, शाळेचे कार्यरत गाव न देता तेथून दूर 10 ते 60 किलोमीटर दूर चे गाव देण्यात आले आहे.
अमरावती जिल्हयात मेळघाट सारखा अतिदुर्गम भाग आहे त्यात दोन तालुके येतात. भौगोलिक दृष्ट्या अमरावती जिल्हयाचा विचार करुन तसेच संबंधित प्रकणक यांच्याकडे संबंधित त्याच्या आस्थापना चे काम आहेतच. त्यामुळे सदर जनगणना करतांना सर्वांना सोयीचे होईल या करिता कर्मचारी, शिक्षक, अधिकारी हे जेथे कार्यरत आहे तेथेच प्रगणक म्हणून नेमणूक करण्याबाबत विनंती केलेली आहे.
जनगणना 2027 चे काम करतांना भौगोलिक स्थितीचा विचार करुन व प्रगणक यांनी व्यवस्थितरित्या काम करण्याकरिता HLB वाटप करतांना शासन निर्देशानुसार प्रगणकांना शक्यतोवर जवळच्या HLB देण्याबाबत आपले स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी व तसे या कार्यालयास कळविण्यात यावे.










