आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण rajarshi shahu maharaj jayanti bhashan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण rajarshi shahu maharaj jayanti bhashan 

लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार, कुशल व्यवस्थापक, जलनीती तज्ञ ..

छत्रपती राजश्री शाहू महाराज. यांना मानाचा मुजरा

आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज असते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे.

आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान, सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, -मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक कार्य केले. त्यात गुन्हेगारी जमातीवरील गुन्हेगारीचा शिक्काबंद, मुलांच्या सक्तीच्या

शिक्षणासाठी पालकांना दंड, सहकारीत्वाची भावना वाढविणे, जनहितार्थ कायद्याची मांडणी करणे, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, विधवा पुर्नविवाह कायदा आणणे, मूलगामी सुधारणा करणे, शेतीसाठीची पाणीव्यवस्था पाटबंधारे, कोल्हापुरी बंधारे आणि मालासाठी बाजारपेठा व कारखाने यांची उभारणी हे उरिष्ट्ये पेवून शाहू महाराजांनी ‘नव्या सामजिक क्रांतीचा’ पुरस्कार केला.

शिक्षणाची संकल्पना, जानवार नेतृत्व स्वाबलंबन, शिस्त, सहकार्य, नियमितता, सहिष्णूता, देशप्रेम इत्यादी गुणासाठी प्रयत्न केले. लोकशाही, नवनिर्मितीक्षम आणि सामाजिक सुधारणेचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक धोरण आजही देशाला प्रेरणादायी ठरत आहे. वसतीगृहे, शिष्यवृत्ती, शाळा व नोकरीत राखीव जागाची तरतुद, जातीप्रथेला विरोध, वेठबिगारीला विरोध, स्त्री शोषणाला विरोध करून वेगवेगळे कायदे अस्तित्वात आणूण सामाजिक सुधारणा, बंधुभाव, शिक्षण, कृषी, उद्योग, कला या क्षेत्रात केलेले लोककल्याणकारी कार्य बहुजन समाजाला न्याय हक्क देण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे अश्या राष्ट्रपुरुषाच्या कार्याची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होवू शकत नाही. म्हणून या थोर माणसाच्या विचार व कार्याला समाजापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनमित्त विनम्र अभिवादन.

Related posts:

Leave a Comment