सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता नोंदणी शुल्क लिंक उपलब्ध करून देण्यात आली असल्याबाबत registration shulka link available
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात येते की,
१) सन २०२५-२६ पासून शाळा । कनिष्ठ महाविद्यालयांचे नोंदणी शुल्क (Registration fee) भरण्याची प्रक्रिया online करण्यात आली आहे.
२) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता नोंदणी शुल्क (Registration fee ) भरण्याची link दिनांक २७/०७/२०२६ पासून प्रचलित पद्धतीने शुल्क आकारणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३) सर्व मान्यताप्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांना मंडळामार्फत दरमहा शिक्षण संक्रमण अंक छापील स्वरुपात देण्यात येत होता. तथापि जुलै २०२६ पासून शिक्षण संक्रमण अंक Digital स्वरुपात विनाशुल्क मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उपरोक्तवाबत सर्व मान्यताप्राप्त शाळा / कनिष्ठ महाविद्याल यांना आपल्या स्तरावर अवगत करून देण्यात यावे. सदर प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.











