जनगणना 2027 अंतर्गत विविध घटकांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक निकषांबाबत census economic nikash 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनगणना 2027 अंतर्गत विविध घटकांसाठी मंजूर केलेल्या आर्थिक निकषांबाबत census economic nikash 

राज्यात जनगणना-2027 ची तयारी सुरु आहे. क्षेत्रीय कामकाजाच्या योजनेची रूपरेषा आणि जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतची माहिती या संचालनालयाच्या पूर्वीच्या परिपत्रक क्रमांक । आणि ।। द्वारे आधीच कळवण्यात आली आहे. भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयाकडून दिनांक 24-12-2025 रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार, जनगणना-2027 च्या विविध घटकांसाठी मंजूर झालेले आर्थिक निकष प्राप्त झाले आहेत. भारताची जनगणना 2027 मध्ये माहिती संकलनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि माहिती जलदगतीने प्रसिद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. जनगणना-2027 च्या विविध घटकांतर्गत भारत सरकारने मंजूर केलेले आर्थिक निकष जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी पुढील परिच्छेदांमध्ये तपशीलवार दिले आहेत.

2.

जनगणना अधिका-यांसाठीमानधन

2.1 भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाकडूनजारी केलेल्यापरिपत्रक क्र.5 नुसार महाराष्ट्र शासनाने सर्व प्रशासकीय स्तरांवर जनगणना अधिकाऱ्यांचीनियुक्ती केलेली आहेजे त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रातील जनगणनेच्या कामांसाठी जबाबदार आहेत. जनगणना अधिनियम, 1948 च्या कलम 4 च्या उप-कलम (2) अंतर्गत राज्य शासनाने 23 डिसेंबर, 2025 रोजी एक वैधानिक आदेश, म्हणजेच शासन निर्णय जारी केला आहे. यासंबंधीची राज्य राजपत्रातील अधिसूचना देखील 23 डिसेंबर, 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. सर्व जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती जनगणना अधिनियम, 1948 आणि जनगणना नियम, 1990, वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार, यांमधील तरतुदींनुसार केली जाईल. यासंदर्भातील सविस्तर

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment