दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी स्वातंत्र्यदिना निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत independence day shasan nirnay 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ रोजी स्वातंत्र्यदिना निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत independence day shasan nirnay 

संदर्भ:- १. क्र.शिउसं/एसडी-४/कवायत/२०२६/३४६६ दि. २७/०७/२०२६

२. शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.३६४/एस.डी-४. दि.३१.१२.२०२४

३. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ३६४/एस. डी. ४. दि.१९.०७.२०२५ (प्रत संलग्न)

उपरोक्त शासन परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२४ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध (प्रभात फेरी, भाषण/निबंध कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी) उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत,

संदर्भाधीन शासन पत्र दि.१९ जुलै, २०२५ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि. १५ ऑगस्ट. २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये कवायात कार्यक्रमाचे (साधारणतः वीस मिनिटे कालावधी) आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत.

१. वेगवेगळ्या वयोगटासाठी विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात. २. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा.

३. यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करुन हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील, तसंच, आवश्यक सराव करुन कवायत प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment