दिनांक ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत kalpanik vetanvadh

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत kalpanik vetanvadh

वाचा :-

१. शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः वेतन २०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. १९/१२/२०२५

२. शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांकः न्यायाप्र २८२३/प्र.क्र.४३/ टीएनटी-३, दि. ०७/०७/२०२३

३. शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांकः वेतन २०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि.२८/०६/२०२३

प्रस्तावना-

उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये दिनांक ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर सूचना खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रकः

वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ अन्वये दिलेल्या सूचना खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे.

२. वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.३ अन्वये दिलेल्या सूचना या विभागाच्या संदर्भाधीन क्र.२ येथील शासन परिपत्रकाअन्वये खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू केल्या आहेत. सदर वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र.३ अन्वये दिलेल्या सूचना आता वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. १ नुसार दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणा-या खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहेत. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६०६०४१८१११०४९२१ हा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment