जवाहर नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणेबाबत javahar navoday pariksha online application 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जवाहर नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षा २०२६ चे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणेबाबत javahar navoday pariksha online application 

महोदय / महोदया

आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता पाचवीचे वर्ग असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, वि‌द्यार्थी आणि पालकांना खातील महत्वपूर्ण माहिती देण्यात यावी.

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार ‌द्वारा संचालित लातूर येथील जवाहर नवोदय वि‌द्यालयात २०२६-२० या शैक्षणिक वर्षासाठी सहावीत प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर प्रवेश प्रक्रियाची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा वि‌द्यार्थी इयता तीसरी चौथी मध्ये सलगपणे उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता पाचवी मध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२६ मध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा त्याचा जन्म दिनांक 01 मे 2014 ते 31 जुलै 2016 (दोन्ही दिवस पकडून दरम्यानचा असावा त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील जवाहर नवोदय वि‌द्यालयात मुलगा, मुलगी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, शहरी-ग्रामीण यांमध्ये स्वतंत्र आरक्षण असल्यामुळे, पालकांनी भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करावी. लातूर जिल्हयात, लातूर महानगरपालिका, नगरपरिषद उदगीर, निलंगा, अहमदपूर, औसा आणि नगरपंचायत-धाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, रेणापूर शहरी क्षेत्राखाली येतात. वि‌द्यार्थ्यांने इयत्ता री, 4थी आणि 5वी दरम्यान एक दिवस जरी शहरी भागात शिक्षण घेतले असेल तर तो नियमांनुसार शहरी क्षेत्रांतर्गत गणला जाईल

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२५ आहे शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाइटवर तनाव बेत असल्याने पालकांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरावेत सदर परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हयातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. इतर मागास (ओ. बी. सी.) प्रवर्गात अर्ज भरणान्या वि‌द्याथ्यांनी मार्च २०२५ पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओ. बी. सी. फॉर्म नंबर.09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येत नसल्याने अर्ज भरताना परीक्षेचे माध्यम वर्ग, शहरी/ग्रामीण, मुलगा/मुलगी, याची खात्री केल्यानंतरच ऑनलाइन अर्ज जमा करावा.

सदर माहिती संबंधितांना तात्काळ देण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment