शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत shvr school atmosphere paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत shvr school atmosphere paripatrak 

संदर्भ :- १) केंद्रशासनाचे पत्र क्रमांक D.O.N०. ३-१/२०२६ SHVR, दि.१५/०७/२०२६. २) समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/SHVR/१/२०२६-२७, दिनांक २० जुलै, २०२६.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, ‘शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेवावतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७ मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत संचालनालयास पत्र प्राप्त झाले आहे. (संदर्भिय पत्राची व त्यासोबतच्या सहपत्राची प्रत सोबत जोडली आहे).

स्वच्छ आणि हरित विद्यालय (SHVR) २०२५-२६ च्या यशाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत (SHVR) २०२६-२७ ची अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. SHVR २०२६-२७ साठीची अंमलबजावणी रुपरेषा, मूल्यमापन पध्दती आणि मूल्यांकन प्रक्रिया या SHVR २०२५-२६ प्रमाणेच राहतील. शाळांची नोंदणी व स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल अॅप दि.१ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित करण्यात येतील. वैध UDISE + कोड असलेल्या सर्व शाळांनी SHVR पोर्टल किवा मोबाईल अॅपद्वारे SHVR २०२६-२७ मध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे,

SHVR २०२६-२७ साठी राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन कार्यक्रम NCERT आणि UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतील.

SHVR २०२६-२७ हा कार्यक्रम देशातील UDISE + वैध कोड असलेल्या सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. यात शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्यांक शाळांचा समावेश असेल. शाळांचे मूल्यमापन खालील सहा विषयाधारित क्षेत्रांमध्ये करण्यात येईल.

पाणी (Water)

शौचालये (Toilets)

साबणाने हात धुणे (Handwashing with Soap)

संचालन व देखभाल (Operation & Maintenance)

वर्तन परिवर्तन व क्षमता विकास (Behaviour Change & Capacity Building)

मिशन उपक्रम (Mission LiFE Activities)

SHVR पोर्टल हे शाळांमधील पाणी, स्वच्छता व स्वच्छताविषयक सवयी (WASH), शाश्वतता आणि मिशन LIFE उपक्रमांशी संबंधित माहितीचे राष्ट्रीय भांडार म्हणून कार्यरत राहील. यामुळे जिल्हा स्तरावर पुराव्यावर आधारित नियोजन, देखरेख आणि अहवाल निर्मिती सुलभ होईल.

सोबत स्वच्छ आणि हरित विद्यालय २०२६-२७ अंमलबजावणी वेळापत्रक देण्यात येत आहे.

शाळा स्तरावरील अर्ज ऑनलाईन सादर करणे दि. १ ऑगस्ट, २०२६ ते दि.३० सप्टेंबर २०२६.

जिल्हा स्तरावरील शाळा निवड प्रक्रिया दि. १ ऑक्टोबर, २०२६ ते दि. ३१ ऑक्टोबर, २०२६.

राज्य स्तरावरील शाळा निवड प्रक्रिया दि.८ नोव्हेंबर, २०२६ ते दि.७ डिसेंबर, २०२६.

स्वच्छ आणि हरित विद्यालय स्पर्धेत खालील प्रमाणे सहभागी व्हावे.

१. SHVR पोर्टल किवा मोवाईल अॅपवर शाळेचा UDISE कोड वापरुन नोंदणी करावी.

२. नोंदणी झाल्यानंतर नमूद मुद्दयांनुसार स्व-मूल्यांकन करुन माहिती भरावी.

३. मुख्याध्यापकाने स्व-मुल्यांकन अर्ज सादर करावा.

४. स्व-मुल्यांकन अर्ज भरल्यानंतर शाळांना वेगवेगळ्या श्रेणीच्या आधारे गुण दिले जातील.

५. गुणांच्या आधारे आपल्या शाळांचे स्टार रेटिंग आणि मान्यता मिळवा.

शाळांची नोंदणी व स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी SHVR पोर्टल आणि मोबाईल अॅप दि.१ ऑगस्ट २०२६ पासून कार्यान्वित करण्यात येतील. UDISE वैध कोड असलेल्या सर्व शाळांनी पोर्टल किंवा मोबाईल अॅपद्वारे SHVR २०२६-२७अनिवार्यपणे सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना सूचना देण्यात याव्यात.

वेब पोर्टल: https://shvr.education.gov.in

Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 04-

08-2026 09:47:32

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.

शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा आणि सर्व समावेशक उत्तमपणे शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्तनात्मक परिवर्तन, स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन (SHVR) २०२६-२७मध्ये सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सहभाग घेण्याबाबत MPSP ने पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

Related posts:

Leave a Comment