मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जबरदस्त सूत्रसंचालन चारोळ्या उपलब्ध marathvada muktisangram din sutrasanchalan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जबरदस्त सूत्रसंचालन चारोळ्या उपलब्ध marathvada muktisangram din sutrasanchalan 

स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम

मी ….. सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो ….

15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा संपूर्ण भारत स्वतंत्र झाला नाही. हैद्राबाद, जुनागड व काश्मीर ने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला

उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ||2||

हैद्राबाद व मराठवाड्यातील लोकांचे स्वातंत्र्याचे अधुरे राहिल्याने पुन्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते

लोकांना भारतात सामील व्हायचे होते त्यामुळे शसस्त्र लढा उभारण्यात आला होता मराठवाडा चा भाग हा हैद्राबाद संस्थानच्या अंतर्गत येत होता स्वतंत्र भारतात सामिल होण्यास विरोध करणा-या निझामाने १९४८ साली ह्या दिवशी शरणागती पत्करली.

स्टेट काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी आणी आर्यसमाजी नेतेमंडळी ह्या लढ्यात सामील होत्या. सरदार वल्लभभाई पटेलांनी सोलापुरमार्गे सैन्य हैदराबादला पाठवुन अॅक्शन यशस्वी केली.

मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. रझाकाराच्या अत्त्याचाराला त्रस्त जनतेला स्वातंत्र्य १३ महिन्यांनंतर मिळाले स्वामी रामानंद तिर्थ ह्या लढ्याचे सर्वोच्च नेते, लढ्यात सामील इतर काही नावं. गोविंदभाई श्रॉफ, पि व्ही नरसिंहराव, शंकरराव चव्हाण, कॉ. चंद्रगुप्त चौधरी, कॉ व्हि डि देशपांडे, गंगाप्रसादजी अग्रवाल, विनायकराव चारठाणकर, बाबासाहेब परांजपे, नारायणराव लोहारकर, भगवानराव देशपांडे व इतर नेतेमंडळी होती.

१७ सप्टेंबर, आज……. वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस.

झेलली छातीवर गोळी त्या विरांसाठी दिला पोटचा गोळा त्या मराठवाड्यासाठी साठी पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी कोटी-कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येका साठी

सर्वांना स्थानापन्न करणे

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव,

माणुसकी म्हणजे माणसाने, माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणुस ओळखून पुढे, केलेला मदतीचा हात…! माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आपल्या आजच्या अध्यक्षांची ओळख…

असेच आपले ……….. हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो.

प्रमुख पाहुणे

चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते,

असेच प्रेरणास्थान असलेले आपले…………

आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्विकारतील अशी मी त्यांना विनंती करतो

हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा जोर पकडू लागला. आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.

त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा हा दिवस, मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनीकांना आणि हुतात्म्यांना अभिवादन.

दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन

‘निधडी छाती निःस्पृह बाणा लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान”

असंख्य हुमात्म्यांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून मराठवाडा मुक्ती क्रांती ची एक ज्योत पेटवली गेली, अखंड दिपासारखे आयुष्य उजळून स्वातंत्र्याची ज्योत कायम तेवत रहावी या साठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या संग्राम विरांसाठी आपणही एक ज्योत प्रज्वलीत करणार आहोत

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांना मी विनंती करतो की त्यानी क्रांती दिनाचे स्मरण राहण्यसाठी आज दिपप्रज्वलन करावे

स्वागत ( अध्यक्ष व प्रमुख पाहुणे)

काळजातले भाव हे नजरेने बघुन कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात मिळतात येथे माणसे हजारोंनी लाखोनी, पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त “योगायोग” असावे लागतात आणि म्हणूनच तुमच स्वागत करण हे आमच आद्य कर्तव्य आहे

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत ….. हे करतील अशी मी त्याना विनंती करतो.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे ………. यांचे स्वागत………हे करतील अशी मी त्याना विनंती करतो

स्वागत गीत

मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त त्या विर सेनांनीना देऊन वंदना आपल्या स्वागता हर्षभराने जमलो आम्ही सर्व प्रेमे गाऊनी स्वागतगीत येथे

अतिथी देवो भवः म्हणून फक्त पुष्प गुच्छाच स्वागत पुरेस ठरणार नसल्याने शब्द सुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहे.

प्रमुख पाहुणे परिचय

आज आपले भाग्य म्हणून आपल्याला… हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून ……….. व्यासपिठा वरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी ………. यांना आमंत्रीत करतो.

प्रास्ताविक

सर्व फुलात गुलाबाला महत्व आहे अंधारात प्रकाशाला महत्व आहे दुखात सुखाला महत्व आहे तसेच कार्यक्रमात प्रास्ताविकाला महत्व आहे

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक…………. हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.

भाषण विद्यार्थी किंवा शिक्षक

भारतात सामील न झालेले ‘हैदराबाद’ निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी

१७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे प पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली.

उषःकाळ झाली स्वातंत्र्याची देश उजाळला सर्व जरी तरी मराठवाड्याची रात्र होती अजूनही अंधारातच पेटवल्या पुन्हा मशाली पुन्हा तोच स्वातंत्र्य संग्राम उगवला बलिदानाने 17 सप्टेंबर चा सुर्य तो उत्सवाचा अन्

भाषण पाहुणे

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. अशाच चांगल्या विचारांचे कार्यक्रमाचे पाहूणे आपले विचार व्यक्त करतील

प्रत्येक पाहुण्याच्या भाषणातील महत्वाचा मुद्दा सांगावा

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत, गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोलाचे योगदान आहे.

सैनिकांनी नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.

गूंज रहा था दुनिया में भारत का नगाड़ा चमक रहा आसमा में देश का सितारा पर अंधेरोमे लिपटा था मराठवाडा हैद्राबाद हमारा

अध्यक्षीय भाषण

गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर गवत झुलते वा-याच्या झोतावर पक्षी उडतो पंखाच्या जोरावर माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि कार्यक्रम फुलतो अध्यक्षीय भाषणावर

ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..

म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे व अशी गुरूकिल्ली लिहणारे आपले

अध्यक्षीय भाषण

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ………..हे अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्याना विनंती करतो.

मराठ्वाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्रविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या स्वातंत्रविरांना मागचा मुजरा. यांच्यामुळेच आज मराठवाडा मानाने उभा आहे

मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोर्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो.

औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्याला प्रगल्भ अशी सांस्कृतिक, सामाजिक वैचारिक, संस्कृती लाभली आहे म्हणून मराठवाडा दिमाखात उभा आहे.

आभार प्रदर्शन

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले कार्यक्रम संपतांना, आता डोळे भरुन आलेच आभार प्रदर्शन कडे शनि कडे जाताना

आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदर्शन…….. हे करतील अशी मी त्याना विनंती करतो…

 

Related posts:

Leave a Comment