अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत shalartha pranali paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदानित माध्यमिक/प्राथमिक/कनिष्ठ महाविदयालय कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती व अनुषांगीक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करणेबाबत shalartha pranali paripatrak

संदर्भः- १ शासन निर्णय क्र. ई गव्ह-१५१९/प्र.क्र.१८/ संगणक, दि.१९ सप्ोबर २०१९

२. मा. शिक्षण आयुक्त कार्यालयाचे क्र. आशिका /२०२५/संपर्कअधि/ई. गव्ह. १४३, दिनांक-३०/१२/२०२५ व समक्रमांकाचे दिनांक-५/५/२०२५ चे आदेश

ईगव्हर्नन्स अंतर्गत विभागतील माहिती व तंत्रज्ञान सेवा परिणामकारकरित्या उंचावण्यासाठी आवश्यक ती मानके विकसित करून माहिती व तंत्रज्ञान संसाधनांची उपयोगीतता वाढवण्याकरीता विभागाअंतर्गत वेगवेगळे पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची सेवानिवृत्ती प्रकरणे विहीत कालमर्यादेत निकाली काढणे व याबाबतची कार्यप्रणालीम पारदर्शक असणे या करीता सेवानिवृत्ती व अनुषांगिक प्रकरणे महालेखाकार कार्यालयाकडे शालार्थ प्रणाली मार्फत सादर करण्याची सुविधा उपलब्ध (LIVE) करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे दि.०१ मे २०२६ पासून महालेखाकार, मुंबई / नागपूर कार्यालयाकडे सेवानिवृत्ती व अनुषांगिक प्रकरणे शालार्थ प्रणालीमार्फत सादर करण्यात यावीत. तूर्त असे प्रस्ताव ऑनलाईन प्रणाली सोबतच प्रचलित ऑफलाईन पध्दतीने महालेखाकार, मुंबई/नागपूर कार्यालयास सादर करावेत.

सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर अपलोड करतेवेळी उ‌द्भवणा-या तांत्रिक अडचणीबाबत महाआयटी (मुंबई) यांच्यांशी संपर्क साधावा. यापुढे सर्व सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने महालेखाकार कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

Related posts:

Leave a Comment