निवडणुक वा अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत nivdnuk pratiniyukti paripatrak
संदर्भ – १) शासन पत्र क्र संकीर्ण २०२६/प्र.क्र. १७६/ टीएनटी-१, दि.३० मार्च, २०२६
२) या कार्यालयाचे दि.०६/०४/२०२६ चे पत्र
३) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१७६/टोएनटी-१, दि.०८ एप्रिल, २०२६
४) या कार्यालयाचे दिनांक २७.०४.२०२६ चे पत्र
५) दिनांक ०९.०५.२०२६ रोजीच्या बैठकीतील निर्देश
उपरोक्त संदर्भ क्र १ व ३ च्या पत्रास अनुसरुन या कार्यालयाने संदर्भ क्र २ अन्वये सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.
सर्व संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त माहिती शासनास संदर्भ क्र ४ च्या पत्रान्वये सादर करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र ५ नुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधीत शिक्षकांना (स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणा-या) त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करावी.
उसेच आपल्या जिल्हयाकडून या कार्यालयारा सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्याचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पहावे. या कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकाची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखाशी संपर्क करुन त्यानाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत.
सर्व संबंधीतांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मुळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर, त्या शिक्षकांचे माहे मे, २६ पेड इन माहे जून २६ पासूनचे वेतन अदा होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी, याबाबत संबंधीत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरुन आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.
तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत. याचा एकत्रित अहवाल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जेणेकरुन एकत्रित अहवाल सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल.










