Comprehensive School Safety and Preparation of School Disaster Management Plan” प्रशिक्षणाकरिता नामनिर्देशने पाठवण्याबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comprehensive School Safety and Preparation of School Disaster Management Plan” प्रशिक्षणाकरिता नामनिर्देशने पाठवण्याबाबत

संदर्भ: कर्नल पी.एस. रेड्डी सहसंचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM), विजयवाडा, आंध्रप्रदेश यांचे पत्र NIDM/VIJ/२०२६-२७/CSS दि. ४ ऑगस्ट, २०२६.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM), गृह मंत्रालय, भारत सरकारतर्फे “Comprehensive School Safety and Preparation of School Disaster Management Plan” या विषयावर दि.०७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत NIDM दक्षिण कॅम्पस, विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेसाठी इच्छुक गट अ संवर्गातील ४ अधिकाऱ्यांची नामनिर्देशने पाठवण्याबाबत कळवण्यात आले आहे.

तदनुषंगाने आपल्या कार्यालयातील इच्छुक गट’अ’ संवर्गातील अधिकाऱ्यांची नामनिर्देशने (नाव, पदनाम, कार्यालयाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल) socialsciencedept@maa.ac.in या मेलवर दि. १५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत पाठवावेत. प्रशिक्षणात सहभागी अधिकाऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था NIDM कॅम्पसमध्ये करण्यात आली आहे. तथापि प्रवास खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरून करण्यात यावा असे निर्देश आहेत. तसेच, NIDM कडून सहभागाची अधिकृत पुष्टी प्राप्त झाल्यानंतरच प्रवासाचे नियोजन करावे.

परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment