PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती पोर्टल लिंकवर भरणेबाबत pm shri yojana portal link
PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवरील https://pmshri.education.gov.in/sqaf/activities या लिंकवर माहिती दि.१२/०७/२०२५ रोजी पर्यंत भरणेबाबत.
संदर्भ:- केंद्र शासनाकडील दि.०४/०७/२०२५ रोजीचा ऑनलाईन व्ही.सी.चा ई-मेल.
महोदय,
PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवर https://pmshri.education.gov.in/sqaf/activities या लिंक/टॅबवर भरण्याकरिता केंद्र शासनाच्या शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालयाने पोर्टल विकसित केलेले आहे.
सदर पोर्टलवर PM SHRI योजनेतंर्गत PM SHRI शाळांव्दारे सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती भरावयाची आहे. त्यानुषंगाने माहीती भरावयाच्या कार्यपध्दतीची मार्गदर्शिका व ३९ उपक्रमनिहाय प्रश्नावलीची पुस्तिका विकसित केलेली आहे. सदर दोन पुस्तिका सोबत आपल्या सुलभ माहिती व अंमलबजावणी करण्याकरिता पाठविण्यात येत आहेत.
उपरोक्त PM SHRI SQAF पोर्टलवर https://pmshri.education.gov.in/sqaf/activities या लिंक/टॅबवर माहिती भरण्याबाबतचे प्रात्यक्षिक केंद्रशासनामार्फत दि.०४/०७/२०२५ व या कार्यालयामार्फत दि.०७/०७/२०२५ रोजी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे जिल्हा नोडल अधिकारी यांना देण्यात आलेले आहे.
तरी PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील PM SHRI शाळांना सन २०२४-२५ मध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या ३९ उपक्रमांची माहिती PM SHRI SQAF पोर्टलवर https://pmshri.education.gov.in/sqaf/activities या लिंक/टॅबवर दि.१२/०७/२०२५ पर्यंत भरण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यिात यावे ही विनंती.












