“ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढवणेबाबत jansuvidha vishesh anudan paripatrak
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन निर्णय क्रमांकः विकास-२०२६/प्र.क्र. १४९ (संगणक क्र. १७५६३०५)/यो-६
बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट,
मंत्रालय, मुंबई – ४००००१
दिनांकः २९ सप्टेंबर, २०२६
वाचा:-
१) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन निर्णय क्र. ददभू-२०१०/प्र.क्र.६२/पंरा-६, दि.१६.९.२०१०.
२) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन निर्णय क्र. ग्रापंई-२०१३/प्र.क्र.१८९/पंरा-७, दि.३०.१.२०१४
३) ग्रा.वि.व.ज.सं.वि., शासन शुध्दिपत्रक क्र. जनसु-२०१६/प्र.क्र.२१०/यो-०६, दि.०३.०१.२०१७
४) ग्रा.वि.वि., शासन निर्णय क्र. जनसु-२०१७/प्र.क्र.१११/यो-०६, दि.२५.०१.२०१८
५) ग्रा.वि.वि., शासन निर्णय क्र. विकास-२०२६/प्र.क्र.१४९/यो-०६, दि.२०.०७.२०२६
प्रस्तावना:-
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” याबाबत दि.१६.९.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. तसेच, संदर्भाधीन क्र.४ व ५ येथील शासन निर्णयान्वये जनसुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविण्यात आली असून सदर कामांना खर्चाची मर्यादा लागू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत कामांची व्याप्ती वाढविण्याची मागणी होत असल्याने काही नवीन कामांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
“ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान” या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत संदर्भाधीन क्र.४ येथील शासन निर्णयामधील कामांमध्ये अ.क्र.१ (फ) नुसार खालील नवीन कामांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे.










