माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि.१५ ऑक्टोबर हा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत vachan prerana din celebration paripatrak
संदर्भ : शासन परिपत्रक क्र. वाप्रेदि-२०२५/प्र.क्र.११६/भाषा-३ दि. १९.०९.२०२५
उपरोक्त विषयी संदर्भीय विषयान्वये माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि.१५ ऑक्टोबर हा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करणेबाबत शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीजतन करण्याच्या उद्देशाने दि.१५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयास अनुसरुन शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धतीगत करण्याच्या दृष्टीने मराठी विश्वकोश आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्याबाबत निर्देश आहेत.
संदर्भीय शासन निर्णयानुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना आपल्या अधिपत्याखालील शाळांना देण्यात याव्यात व त्याबाबतचा अहवाल शासनास व या कार्यालयास सादर करावा.











