बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रकमेमध्ये सुधारणा करणे तसेच स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचना balchitrakala competition bakshish rakkam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालचित्रकला स्पर्धा शुल्क आणि बक्षिसांच्या रकमेमध्ये सुधारणा करणे तसेच स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचना balchitrakala competition bakshish rakkam 

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

शासन निर्णय क्रमांक :- एडीआर-२०२५/CN-११८२७३२/प्र.क्र. ७४/तांशि-६,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक :- १४ जुलै, २०२५.

वाचा :-

१) उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग शासन निर्णय क्रमांक ओडीआर-१०९२/९७५८ (५०) साशि-५, दिनांक १ स्प्टेंबर, १९९४

२) महाराष्ट्र कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ अधिसूचना असाधारण क्रमांक १४, दिनांक १९ जानेवारी, २०२४.

३) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ स्थापना अधिसूचना दिनांक २९ मे, २०२४

४) महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे पत्र क्रमांक मराकशिमं/२०२५/सात/४८९, दिनांक ३० मे, २०२५.

५) कला संचालक यांचे पत्र क्रमांक डिओओ-२०२५/दोन/९३१, दिनांक ०३ जून, २०२५.

प्रस्तावना :-

कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून सन १९७२ पासून शालेय विद्यार्थ्याकरिता बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. आता महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ अन्वये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. उपरोक्त अधिनियमाचे कलम ८ मधील तरतुदीनुसार, सन २०२५-२०२६ पासून, बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येणार आहे.

०२. प्रचलित बालचित्रकला स्पर्धेचे परीक्षा शुल्क व बक्षिसांच्या रकमा दि. १ सप्टेंबर, १९९४ च्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आल्या आहेत. तद्नंतर मागील ३० वर्षापासून बक्षिसांच्या रकमा आणि परीक्षा शुल्क यामध्ये सुधारणा करण्यात आली नव्हती. सबब, बालचित्रकला स्पर्धेचे परीक्षा शुल्क, बक्षिसांच्या रकमा आणि स्पर्धा आयोजनाच्या मार्गदर्शक सुचना यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे:-

शासन निर्णय :-

०१. उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभागाचा शासन निर्णय क्रमांक ओडीआर-१०९२/९७५८ (५०) साशि-५, दिनांक १ सप्टेंबर, १९९४ अधिक्रमित करण्यात येत आहे.

०२. सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ यांच्याकडून करण्यात येईल.

०३. “बालचित्रकला स्पर्धा” याकरिता आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून खालील प्रमाणे सुधारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

(३) मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन उपसंचालक (प्राथमिक / माध्यमिक), शालेय शिक्षण संचालनालय, चर्नी रोड, मुंबई यांच्यामार्फत करण्यात येईल. उर्वरित जिल्हयांमध्ये संबंधित जिल्हापरिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून (प्राथमिक /माध्यमिक) स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.

(४) संबंधित केंद्र / शाळांनी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर, बालचित्रकला टॅबमध्ये, स्पर्धेत सहभागी होणारी केंद्र/शाळा व विद्यार्थ्यांची गटनिहाय प्रवेश नोंदणी, ऑनलाईन पध्दतीने करावी.

(५) स्पर्धेच्या गटनिहाय प्रश्नपत्रिका, संबंधित केंद्र / शाळांना ऑनलाईन (प्रत्येक केंद्र/शाळा करिता एक) उपलब्ध करुन देण्यात येतील. तद्नंतर संबंधित वर्गातील पर्यवेक्षकांने गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय फळ्यावर (Black board) लिहून देणे बंधकानकारक राहील. (६) स्पर्धकांना ११ इंच X १५ इंच आकाराचा कागद (ड्रॉईंग पेपर) संबंधित केंद्र / शाळांनी पुरविणे आवश्यक राहील. बालचित्रकला स्पर्धेकरिता जमा होणाऱ्या परीक्षा शुल्कातून केंद्र / शाळांनी ड्रॉईंग कागदाचा खर्च वजा करुन, उर्वरित रक्कम मंडळाकडे जमा करावी.

(७) स्पर्धकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी, स्वतःचे रंग (क्रेयॉन, जलरंग, पोस्टर कलर), ब्रश व इतर चित्रकला साहित्य यांचा वापर करून दोन तासात चित्र पूर्ण करणे आवश्यक राहील. (८) जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा बक्षिसे व प्रमाणपत्रे यांचे वितरण बालदिनी म्हणजेच दि.१४ नोव्हेंबर या दिवशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक यांच्याकडून करण्यात येईल.

(९) बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्याकडून प्राप्त होणारे परीक्षा शुल्क, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. जिल्हा व राज्य पातळीवर होणारा बक्षिसांवरील खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येईल.

०६. तालुका पातळीवरील स्पर्धेचे आयोजनः-

तालुका पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी, संबंधित पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून खालील प्रमाणे समिती गठित करण्यात येईल:-

समितीकडून प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० X ४ गट = एकूण ८० चित्रे) निवडण्यात येतील. निवडण्यात आलेली चित्रे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील.

०७. जिल्हापातळीवरील स्पर्धेचे आयोजन:-

 

Related posts:

Leave a Comment